कडेगाव : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची ३४ वी पुण्यतिथी त्यांच्या जन्मगावी देवराष्ट्रे येथे रविवारी, २५ रोजी विविध उपक्रमांनी साजरी झाली. यानिमित्ताने आ. मोहनराव कदम, आ. डॉ. विश्वजित कदम, जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी देवराष्ट्रे येथे यशवंतरावांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम यशवंतरावांनी केले. आपल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी मुख्यमंत्री पदाबरोबरच केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम, देवराष्ट्रेचे सरपंच प्रकाश मोरे, साहित्यिक अनिल बोधे, कवी प्रदीप पाटील, केन अॅग्रो कारखान्याचे संचालक धोंडीराम महिंद, क्रांती कारखान्याचे संचालक भीमराव महिंद, पंचायत समिती सदस्या स्मिता महिंद, माजी उपसभापती मोहनराव मोरे, तानाजी महिंद, प्रमोद गावडे, माणिक मोरे, बाळासाहेब पवार, आत्माराम ठोंबरे, लक्ष्मण पाटील, संजय मोरे, महादेवराव महिंद, मोहिते वडगावचे सरपंच विजय मोहिते, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुनील जगदाळे आदींसह ग्रामस्थ, युवक तसेच देवराष्ट्रे व परिसरातील यशवंतप्रेमींनी एकत्र येत त्यांच्या जन्मघर स्मारकास भेट देऊन पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या कार्याचा आढावा घेण़्यात आला.स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार : संग्रामसिंह देशमुखयशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारकाचे काम शेजारील जागेच्या भूसंपादन प्रक्रियेच्या पूर्णत्वाअभावी रखडले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या व संबंधित अधिकाºयांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करून रखडलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.स्मारकप्रश्नी औचित्याचा मुद्दा : विश्वजित कदमयशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारकाशेजारील जागा संपादनाची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे स्मारकाचे काम रखडले आहे. या कामासाठी २ कोटी १७ लाखांचा निधी आघाडी शासनाच्या काळात मंजूर झालेला आहे. यामुळे जमीन संपादनाची कार्यवाही तात्काळ पूर्ण करून रखडलेले काम पूर्ण करावे, यासाठी विधानसभेच्या चालू असलेल्या अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करणार आहे, असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.
आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारास जन्मभूमीत अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:11 PM