इस्लामपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिनी इस्लामपूर बसस्थानकामधील प्लॅटफॉर्म व क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा परिसर येथे स्वच्छता मोहिमेतून श्रमदान करत महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. साक्षी ग्रुप, गीतरंग म्युझिक, विद्रोही सांस्कृतिक चळवळ व प्रेरणा फाैंडेशन या सामाजिक संस्थांनी हा उपक्रम राबविला.
धनाजी गुरव म्हणाले, समाजाशी असलेली नाळ कायम राहावी व तरुण पिढीला या श्रमदानाचे महत्त्व कळावे म्हणून हा उपक्रम राबविला आहे. एसटीचा आपल्या विकासातील सहभाग किती मोलाचा आहे व एसटी टिकली पाहिजे, ही सरकार व समाज अशा दोघांचीही जबाबदारी आहे. त्यानंतर वाळवा पंचायत समिती आवारात असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळा परिसराचीही स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमात विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे धनाजी गुरव, दीपक कोठावळे, डॉ. नीलम शहा, आगारप्रमुख शर्मिष्ठा घोलप, मीरा शिंदे, उमेश कुरळूपकर, प्रशांत पाटील, जयवंत रोकडे, विजय कुंभार, अरफान शेख, कृष्ण प्रकाश बल्लाळ, अतुल मोरे, संकेत कचरे, प्रशांत फार्णे, विक्रम, अजय सकटे, रवी सूर्यवंशी, विजय कोठावळे, सचिन यादव, प्रतिमा रंकाले, कोमल कांबळे, दीपक सुतार, अश्विनी चौगुले सहभागी झाले होते.
फोटो-०६इस्लामपूर०६
फोटो-
इस्लामपूर येथे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी श्रमदान करत महापुरुषांना अभिवादन केले.