लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : मराठेशाहीचे पहिले सुभेदार, मराठेशाहीच्या पराक्रमाचा झेंडा फडकवणारे होळकरशाही संस्थानचे संस्थापक इंदोरनरेश मल्हारराव होळकर यांची जयंती विविध उपक्रमाने सांगलीत साजरी झाली. येथील शाहूनगरातील अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेस नगरसेवक राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरसेवक विष्णू माने, आरपीआय आठवले गट महिला अध्यक्ष छायाताई सरवदे, शिरोळ तालुका यशवंत सेना अध्यक्ष अमर पुजारी, शिवाजी शेंडगे, महेश सगरे, महापुरुष विचारमंच अध्यक्ष प्रा. गौतम शिंगे, जिल्हा प्राथमिक संघटना अध्यक्ष अरविंद गावडे, महेश मासाळ आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंच जिल्हा अध्यक्ष अनिल कोळेकर, दयानंद शिवशरण, प्रमोद बणसोडे, तानाजी दुधाळ, लिपिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राज चोपडे, अमृत जानकर, बाळासाहेब खांडेकर, आरपीयचे संतोष सरवदे, दिलीप भिसे, राजू चव्हाण आदी अभिवादन केले. कार्यक्रमाचे संयोजन निवांत कोळेकर, राजू चव्हाण व स्मारक समिती सदस्यांनी केले. कर्यक्रमात महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले. निवांत कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. भारत व्हनमाने यांनी आभार मानले.