ओळ : साेनहिरा कारखाना परिसरातील डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकस्थळी द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, विजयमाला कदम, स्वप्नाली कदम, आमदार विक्रम सावंत यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले.
वांगी/कडेगाव : डॉ. पतंगराव कदम यांना तृतीय स्मृतिदिनी सोनहिरा कारखाना परिसरातील स्मारकस्थळी कदम कुटुंबीय व कार्यकर्त्यांनी भावुक वातावरणात आदरांजली वाहिली व अभिवादन केले. यावेळी आमदार मोहनराव कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, स्वप्नाली कदम, विजयमाला कदम, आमदार विक्रम सावंत, सोनहिरा कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जि. प. सदस्या वैशाली कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक रामचंद्र कदम, विजयसिंह कदम, सागर कदम, सोनहिरा कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांच्यासह कदम कुटुंबीय व नातेवाइकांनी साश्रुपूर्ण नयनांनी आदरांजली वाहिली.
डॉ. पतंगराव कदम यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवारी सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी होत होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत मान्यवर व कार्यकर्ते शिस्तीने आणि रांगेत उभे राहून स्मारकस्थळी अभिवादन करीत होते.
यावेळी भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजित मोहिते, ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते, रामरावदादा पाटील, नामदेवराव मोहिते, सोनहिरा कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव महिंद, संचालक पी. सी. जाधव, दिलीपराव सूर्यवंशी, पंढरीनाथ घाडगे, जगन्नाथ माळी, चिंचणीचे माजी उपसरपंच जलाल मुल्ला, अकबर मुल्ला, इंद्रजित साळुंखे, सागरेश्वर सूतगिरणीचे संचालक उदय थोरात, वांगीचे सरपंच डॉ. विजय होनमाने, येवलेवाडीचे सरपंच अविनाश येवले, प्रा. नामदेव राडे, डॉ. सुधीर जगताप, कडेगावच्या नगराध्यक्षा नीता देसाई, नगरसेवक सागर सूर्यवंशी, समीर मुल्ला, रायगावचे सरपंच समाधान घाडगे, शिरसगावचे सरपंच सतीश मांडके, तडसरचे सरपंच हणमंतराव पवार, माजी जि. प. सदस्य सुरेश मोहिते, प्राचार्या डॉ. सुलक्षणा कुलकर्णी, प्राचार्य धनंजय चौगुले, सूरज पवार, प्रमोद जाधव, राहुल पाटील, दीपक महाडिक, अशोक महाडिक, सुनील जगदाळे, विजय मोहिते, आनंदराव पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी यांच्यासह भारती विद्यापीठ, सोनहिरा कारखाना, सागरेश्वर सूतगिरणी, कृष्णा-वेरळा सूतगिरणी आदी संस्थाचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, काँग्रेससह सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच पलूस कडेगाव मतदारसंघ व जिल्हा आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले व त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.