सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून शुक्रवारपेक्षा रुग्णसंख्या काहीशी घटली असली तरी दिवसभरात १३८ जणांना कोरोनाचे निदान झाले. सांगलीतील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ३८ जण कोरोनामुक्तही झाले आहेत. वाळवा तालुक्यात सर्वाधिक ३७ रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून शंभरपेक्षा जादा रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. शनिवारी १३८ रुग्ण आढळले असले तरी वाढती संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआरअंतर्गत १०१० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात ६७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड ॲण्टीजेनच्या १२०३ जणांच्या नमुन्यांच्या तपासणीतून ७३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होताना ७६६ वर पोहोचली आहे. यातील ६८ जणांची प्रकृती चिंताजनक असून ६० जण ऑक्सिजनवर तर आठ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. कर्नाटक व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येकी एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४९,५५५
उपचार घेत असलेले ७६६
कोरोनामुक्त झालेले ४७,०१७
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७७२
शनिवारी दिवसभरात
सांगली २९
मिरज ८
वाळवा ३७
मिरज तालुका १६
आटपाडी १५
खानापूर ११
तासगाव ९
कवठेमहांकाळ ५
पलूस ४
जत २
कडेगाव, शिराळा प्रत्येकी १