शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

सांगलीत अन्य बाजार समित्यांचाच जीएसटी पॅटर्न : बाजार समितीत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:37 PM

सांगली : हळदीवर जीएसटी कपात करण्यावरून बाजार समिती प्रशासन व व्यापाºयांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बाजार समितीत झालेल्या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढण्यात आला. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये राबविण्यात येणाºया पध्दतीनुसारच येथेही जीएसटीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले.हळदीवर लागू करण्यात आलेल्या जीएसटीच्या प्रश्नावर मंगळवारी बैठक आयोजित ...

ठळक मुद्देहळदीच्या ‘जीएसटी’च्या प्रश्नावर तोडगा; व्यापाºयांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर

सांगली : हळदीवर जीएसटी कपात करण्यावरून बाजार समिती प्रशासन व व्यापाºयांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बाजार समितीत झालेल्या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढण्यात आला. राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये राबविण्यात येणाºया पध्दतीनुसारच येथेही जीएसटीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले.

हळदीवर लागू करण्यात आलेल्या जीएसटीच्या प्रश्नावर मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, बैठकीनंतरही त्यावर तोडगा निघाला नव्हता. अखेर बुधवारी पुन्हा एकदा बाजार समिती पदाधिकारी व व्यापाºयांमध्ये बैठक झाली. सांगली मार्केट यार्डात अडत्यांकडून जीएसटी कपात करण्यात येत असल्याने हळद खरेदीदारांना वर्षाला ३८ कोटी रुपयांचे भांडवल अडकून पडत आहे. व्यापाºयांना याचा फटका बसत असल्याने व्यापाºयांनी बाजार समितीकडे यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती.

त्यानुसार बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्टÑासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यातील प्रमुख हळद व सोयाबीन बाजारपेठांमध्ये अडत्यांकडून खरेदीदारांकडे बिल दिले असता, जीएसटी कपात केली जात नाही. याच धर्तीवर सांगली मार्केट यार्डातही बिले व पट्ट्या करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यात प्रामुख्याने जीएसटी कायद्यांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतीमालाचा व्यवहार होत असेल त्या व्यवहारावर जीएसटीचा आकार ‘नील’ या लिस्टमध्ये असल्याचे सभापतींनी सांगितले. इतर बाजारपेठेप्रमाणेच बिल पट्ट्या नमुने करणे बाजारपेठेच्या हितासाठी आवश्यक असून, त्याचपध्दतीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यावेळी बाजार समितीचे संचालक शीतल पाटील, प्रशांत पाटील, सुरेश पाटील, अजित बनसोडे, बाळासाहेब बंडगर, जीवन पाटील, अडत व्यापारी संघटनेचे राजेंद्र पाटील, सचिव अमर देसाई, चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष दीपक चौगुले, नितीन पाटील, शरद पाटील, शीतल आरवाडे, रोहित आरवाडे, बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील, सहा. सचिव एन. एम. हुल्याळकर, विजय निरवाणे आदी उपस्थित होते.बाजारपेठेच्या हितासाठी निर्णयबाजार समितीच्या सर्व घटकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली बाजारपेठेचा व्यवहार इतर बाजारपेठांकडे वळू नये. तसेच सांगलीतील व्यवहार कमी झाल्यास त्याचा परिणाम अडते, तोलाईदार, हमाल यांच्यासह बाजार समितीवरही होऊ नये यासाठी देशातील इतर बाजारपेठांप्रमाणेच व्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण