लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : पेठ, ता. वाळवा येथील महादेव मंदिराशेजारील तीळगंगा ओढ्याच्या काठाची पूरसंरक्षक भिंत ढासळली होती. याबाबत युवानेते अतुल पाटील यांनी दरवर्षी पावसाळ्यात होणारा त्रास, ओढ्याच्या पात्रातील भाग सातत्याने खचत असल्याने मंदिर व त्या परिसरातील घरे, छोटे व्यावसायिक यांना पाणी पात्राबाहेर येत असल्यामुळे होणाऱ्या धोक्याचे गांभीर्य पटवून दिले. त्यानुसार पालकमंत्री जयंत पाटील यांनी पूरसंरक्षक भिंतीची पहाणी केली. पालकमंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगभाऊ नाईक यांनी तीळगंगा ओढ्याच्या काठाची प्रत्यक्ष पाहणी केली. महादेव मंदिर ते खंडेश्वर मंदिर परिसरामध्ये ओढ्याच्या काठावर दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधणी, विठ्ठल मंदिरासमोर घाट बांधणीसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सूचना केल्या तसेच लिंगायत समाज स्मशानभूमीची भिंत दुरुस्ती, रोहिदासनगर ते खंडेश्वर मंदिर ओढ्यावर छोटा पूल, हनुमान व श्री राममंदिर सभामंडप कामासंदर्भात चर्चा केली. निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात जयंत पाटील यांनी आश्वासन दिले.
यावेळी युवानेते अतुल पाटील, विजयभाऊ पाटील, राहुल पाटील, संदीप पाटील, डॉ. अभिराज पाटील, शरद पाटील, देवराज पाटील, विजय पाटील, हेमंत पाटील, भागवत पाटील, संपतराव पाटील. संतोष देशमाने, अरुण पवार, फिरोज ढगे, रोहित पाटील, सुभाष भांबुरे, पै. जयंत पाटील, सुबराव पाटील, शेखर बोडरे, शिवाजी खापे, शिवाजी पाटील, बजरंग शिद, अंबादास पेटकर, नामदेव कदम, माणिक देशमाने, सुनील तवटे, धनाजी पेठकर, स्वप्निल पेठकर, अमोल भांबुरे, पांडुरंग शेटे, सुनील शेटे, धीरज खंकाळे, सर्जेराव माळी, शुभम माळी, शिवाजी पाटील, अशोक पाटील, विकास जानकर, तुळशीदास पिसे, श्रेयस गाताडे, शिवराज पाटील, रविकिरण बेडके आदी उपस्थित होते.