सांगली : केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना राबविण्यात गावं कमी पडणार नाहीत. स्वच्छता अभियानामुळे गावं सुधारली. याशिवाय अनेक फायदे झाले आहेत. गावे स्वच्छ आणि निटनेटकी झाली पाहिजेत, ही भूमिका घेवून जिल्ह्यातील गावांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला पाहिजे. गावच्या विकासासाठी गावागावांत स्पर्धा निर्माण करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.जिल्हा परिषदेत आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार प्राप्त २० गावांचा सन्मान पालकमंत्री डॉ. खाडे यांच्याहस्ते केला. याप्रसंगी खा. संजय पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, आ. सुमनताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होते.खाडे म्हणाले, अभियानाच्या माध्यमातून गावांची ओळख बदलत चालली आहे. यापूर्वी ज्या गावांना नावे ठेवली, त्यांनी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटविला. तिर्थक्षेत्र विकास, रस्ते दुरुस्तीसाठी निधी मिळतो. गावातील मतभेद विसरुन शासनाने दिलेल्या पैशाचा वापर ग्रामपंचायतींकडून योग्य कामासाठी खर्च झाला पाहिजे.आ. नाईक म्हणाले, ग्रामस्वराज्यमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल. ग्रामीण भागातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी पुढे आले. त्यामध्ये स्वर्गीय आर. आर. आबा, शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, खा. संजय पाटील यांना संधी मिळाली. अभियानाव्दारे गावांतील वाद विसरुन कामे करीत आहेत.आ. सुमनताई पाटील म्हणाल्या, यापूर्वी अंजनीपुरते मर्यादित असलेले आबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचे पोहोचले. आबांनी सुरु केलेले अभियान देशात पोहोचले. अभियानामुळे गावात असलेले तंटे विसरुन लोक एकत्र आले, ही अभिमानाची बाब आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे म्हणाल्या, जिल्ह्यीतील गाव ठरवितात आणि त्याला ग्रामसेवकाने जोड दिल्यास विकासाला बळ मिळते. त्याव्दारे आदर्श गावे तयार करण्याचे काम सुरु आहे.उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, कार्यकारी अभियंता भारती बिराजे, संजय येवले, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांच्यासह सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक उपस्थित होते.गावांत केवळ निवडणुकीत स्पर्धा ठेवा : संजय पाटीलजेवढी लहान गाव, तेवढी निवडणुकीत चुरस निर्माण होते. परंतु निवडणुकीनंतर मतभेद विसरुन एकत्र काम करावे. गावांतील स्पर्धा निवडणुकीपुरती मर्यादित ठेवा, असे आवाहन खा. संजय पाटील यांनी केले.
जिल्ह्यातील १६ गावांचा गौरव२१-२२ यावर्षी नांगोळे (ता. कवठेमहांकाळ), कर्नाळ (ता. मिरज), वांगी (ता. कडेगाव), ढवळेश्वर (ता. खानापूर), शिरगाव (ता. तासगाव), सांडगेवाडी (ता. पलूस), फाळकेवाडी (ता. वाळवा). तसेच सुंदर गाव पुरस्कार : २२-२३ यावर्षी बोरगाव (ता. कवठेमहांकाळ), पद्माळे (ता. मिरज), नागेवाडी (ता. खानापूर), पाडळीवाडी (ता. शिराळा), हिवतड (ता. आटपाडी), कौलगे (ता. तासगाव), खंडोबाचीवाडी (ता. पलूस), रावळगुंडवाडी (ता. जत), मिरजवाडी (ता. वाळवा). जिल्हा सुंदर गाव पुरस्कार : मिरजवाडी आणि बोरगाव (विभागून) या गावांतील सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांनी सन्मान स्वीकारला.