सांगली : शाश्वत जीवनशैलीतूनच शाश्वत विकास शक्य असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डाॅ. जनक पलटा मगिलिगन यांनी केले. विलिंग्डन महाविद्यालयातील पर्यावरण अभ्यास विभागाने डाॅ. मगिलिगन यांचे ‘शाश्वत विकास’ विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित केले होते.
डॉ. मगिलिगन यांनी इंदूर येथील ‘जिम्मी मगिलिगन शाश्वत विकासासाठीचे केंद्र’ आणि ग्रामीण भागातील स्त्रियांसाठीच्या ‘बारली विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण आणि आदिवासी भागात ३०-४० वर्षांत शाश्वत विकासाच्या संकल्पना अमलात आणल्या आहेत. त्यांचा जीवनपट यावेळी विद्यार्थ्यांपुढे उलगडण्यात आला. शाश्वत विकासासाठी आत्मनिर्भर, शाश्वत जीवनशैली आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे परिषद सदस्य डाॅ. विश्राम लोमटे, परिषद सदस्य रामकृष्ण पटवर्धन, प्राचार्य डाॅ. भास्कर ताम्हणकर, राजकुमार पाटील, रवींद्र कुलकर्णी, डाॅ. सिद्धेश्वर जाधव सहभागी झाले. पर्यावरण विभागप्रमुख स्मिता जांभळी, अमन वर्मा, मानसी कुलकर्णी, अनमोल पाटील, संस्कृती गुरव आदींनी आयोजन केले.
-------