शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

राजेवाडीच्या साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्षांवर गुन्हा-खोट्या सह्या कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:07 PM

कारखान्याचे सभासद होण्यासाठी शेतकºयांनी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन आणि खोट्या सह्या करुन कर्ज काढून परस्पर रक्कम हडप केल्याप्रकरणी राजेवाडी

ठळक मुद्देकारखान्याचे सभासद होण्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर

आटपाडी : कारखान्याचे सभासद होण्यासाठी शेतकºयांनी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन आणि खोट्या सह्या करुन कर्ज काढून परस्पर रक्कम हडप केल्याप्रकरणी राजेवाडी (ता. आटपाडी) येथील सद्गुरु श्री श्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांच्यासह सांगलीच्या कॅनरा बँकेचे शाखाधिकारी आणि बँकेच्या अधिकाºयांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अनेक शेतकºयांची अशी फसवणूक केली आहे.

या गुन्ह्यात कारखान्याचे अध्यक्ष शेषगिरी राव (रा. पुणे), उपाध्यक्ष बाळासाहेब कर्णवर (पाटील, रा. गोरडवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), संचालक श्रावण वाक्षे (रा. आटपाडी), कॅनरा बँकेचे सांगलीचे शाखाधिकारी व त्यांचे इतर अधिकारी यांच्यावर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शेतकरी विभिषण महादेव शिरकांडे (रा. राजेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०१० ते २०१७ च्या आॅगस्ट महिन्याच्या दरम्यान सद्गुरू श्री श्री सहकारी साखर कारखाना राजेवाडी येथे सुरू करताना सभासद होण्याकरिता आमच्याकडून पूर्वी घेण्यात आलेली शेजमिनीची कागदपत्रे, ओळखीचे पुरावे, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र यांच्या झेरॉक्स बॅँकेत कर्ज काढण्यासाठी उपयोगात आणल्या आहेत.

बॅँकेच्या अधिकाºयांशी संगनमत करून खोट्या सह्या करून कॅनरा बॅँकेत खाते (क्रमांक १६१३१०१०३४००४ व १६१३८४५००११३५) उघडून त्या खात्यात ३ लाख रुपये कर्ज घेतले. ती रक्कम परस्पर कारखान्याच्या नावावर जमा करून फसवणूक केली. या सर्वांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६५, ४६७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अनेक शेतकºयांची फसवणूक केलेल्या याप्रकरणी तपास सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाSugar factoryसाखर कारखानेPoliceपोलिसSangliसांगली