गुजरात निवडणूक : सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांचा गजर करत साजरा केला जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 02:55 PM2017-12-18T14:55:05+5:302017-12-18T15:00:29+5:30

गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला.

Gujarat elections: Sangli's BJP workers celebration | गुजरात निवडणूक : सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांचा गजर करत साजरा केला जल्लोष

गुजरात निवडणूक : सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांचा गजर करत साजरा केला जल्लोष

Next

सांगली : गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशानंतर सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. राम मंदिर चौकात हा आनंदोत्सव भाजपाने साजरा केला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांसमोर बोलताना पक्षाचे नेते शेखर इनामदार म्हणाले की, हिमाचल प्रदेशच्या माध्यमातून एक नवे राज्य भाजपाला मिळाले आहे. गुजरातमधील निवडणूक तर ऐतिहासिक निवडणूक होती. येथील जनतेने सलग 22 वर्षे भाजप आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. विरोधकांनी सर्वप्रकारे भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेने त्यांच्या या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा येथील जनतेने विश्वास टाकला आहे. नोटाबंदी आणि जीएसटी हे दोन्ही निर्णय देशातील जनतेला पटलेले आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत. गुजरातमधील सर्व बुथ कमिटीवरील कार्यकर्त्यांच्याही कष्टाचे हे फळ आहे. या दोन्ही राज्यातील निकालानंतर सांगली जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला आहे. निश्चितच भविष्यातील सर्व निवडणुकांवर परिणाम करणारा हा निकाल ठरेल, असे ते म्हणाले. 
आनंदोत्सवात यावेळी नगरसेवक युवराज बावडेकर, प्रकाश (तात्या) बिरजे, श्रीकांत शिंदे, गणपती साळुंखे, धनेश कातगडे, शरद नलावडे, पृथ्वीराज पाटील, दरीबा बंडगर, सुभाष माने, सुयोग सुतार, हरीपूरचे सरपंच विकास हनबर, सुभाष गडदे, स्मिता पवार, छाया हाक्के, हेमलता मोरे, गंगा तिडके, उषा गायकवाड आदी सहभागी झाले होते. 

 

Web Title: Gujarat elections: Sangli's BJP workers celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.