लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : दि सांगली रोझ सोसायटी सांगली आणि मराठा समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ व २४ सप्टेंबररोजी गुलाबपुष्प प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सांगलीतील मराठा समाज येथे गुलाबपुष्प व इतर फुलांचे प्रदर्शन, तसेच पुष्परचना स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन दि. २३ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, जयश्रीताई काळम-पाटील यांच्याहस्ते होणार आहे.रोझ सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब चितळे व मराठा समाजचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की, दि रोझ सोसायटीच्यावतीने गेली ३८ वर्षे हे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित केली जाते. दोन दिवस चालणाºया या प्रदर्शनात बेंगलोर, सांगलीसह राज्यभरातून विक्रेते, शेतकरी सहभागी होतील. गुलाब, जरबेराचे प्रदर्शन, पुष्परचना, फुलांची रांगोळी व विविध प्रकार, पुष्परचना स्पर्धा होणार आहेत. शोभिवंत फळझाडे, फुलझाडे, रोपे, बाग साहित्य, पुष्परचनेस लागणाºया साहित्याचे स्टॉलही असतील. दि. २३ व २४ सप्टेंबर रोजी सांगलीत मराठा समाज संस्थेच्या सभागृहात प्रदर्शन भरविण्यात येत आहे. प्रदर्शनात व पहिल्या चारही विभागात कोणाही व्यक्तीला भाग घेता येईल. मतिमंद व मूकबधिर मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यात येऊन त्यांना बक्षिसेही देण्यात येणार आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी विविध फुलझाडे, हॅन्डीक्राफ्ट व टेराकोटा आदी वस्तू व बागकाम साहित्याचे स्टॉल्स उभे केले जाणार आहेत. बक्षीस समारंभ दि. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार असून प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत आणि अनुराधा राऊत आहेत.ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य पी. वाय. मद्वाण्णा, स्वागताध्यक्ष शहाजीराव जगदाळे, खजिनदार अतुल दप्तरदार, उपाध्यक्ष तानाजी चव्हाण, पुष्परचना विभागप्रमुख अध्यक्षा अश्विनी पाचोरे, भारती चोपडे, पद्मजाताई चितळे, ज्योती चव्हाण, शैलजा देशमाने, श्रेया भोसले, नंदा झाडबुके, पद्मजा चौगुले, गीतांजली दप्तरदार, प्रज्ञा सावंत, उषा बसागरे आदी संयोजन करीत आहेत.जुनी वाद्येही स्पर्धेत ठेवणारगुलाबपुष्प व इतर फुलांच्या प्रदर्शनात ७० वर्षांपूर्वीची जुनी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी तंबोरा, ढोलकी, वीणा, तबला अशी वाद्येही सांगलीकरांना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. याबरोबरच दर्शनी विभागात बंगाली कलाकार फुलांनी फ्लेमिंगो आणि फूलपरी साकारणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.डेकोरेशनसाठी बक्षिसेपुष्परचना स्पर्धेत किंग आॅफ दि शो, क्विन आॅफ दि शो, प्रिन्स आॅफ दि शो, प्रिन्सेस आॅफ दि शो आणि जनरल तसेच चॅम्पियनशीप, फ्लोरिस्ट डेकोरेशनसाठी ट्रॉफी व इतर विविध ट्रॉफीज, प्रमाणपत्रे अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. पुष्प मांडणीचीही स्पर्धा होणार असून, तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत.
रोझ सोसायटीतर्फे शनिवारपासून गुलाबपुष्प प्रदर्शन--सांगलीत विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 10:56 PM
सांगली : दि सांगली रोझ सोसायटी सांगली आणि मराठा समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ व २४ सप्टेंबररोजी गुलाबपुष्प प्रदर्शन व स्पर्धा आयोजित
ठळक मुद्दे अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्पर्धा; राज्यभरातून विक्रेते येणार