कोकरुड : कोकरूड-पाचवड फाटा राज्य मार्गावरील सर्व गावांच्या ठिकाणी आरसीसी गटर बांधव्यात आणि कासवगतीने सुरू असलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, असे वृत्त ‘लोकमत’ ने २३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत ठेकेदाराने सय्यदवाडी व येळापूर येथे गटारी बांधण्याचे काम हाती घेतले असून, रस्त्याच्या कामासाठी वेगाने सुरुवात केली आहे.
कोकरूड ते पाचवड फाटा (कराड) या राज्य मार्गाच्या रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या कामास एक वर्षापूर्वी सुरुवात झाली आहे. मात्र कोरोनाच्या काळात हे काम सहा महिने ठप्प होते. गत दोन महिन्यांपासून पुन्हा सुरुवात झाली आहे.
या मार्गावरील मेणीफाटा, सय्यदवाडी, येळापूर, जामदारवाडी, शेडगेवाडी खुजगाव, चिंचोली, कोकरुड या गावांमध्ये आरसीसी गटार अथवा पाइपची गरज असताना ती न टाकल्याने पावसाळ्यात रस्त्यावरील सर्व पाणीशेजारील घरात घुसणार होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ठेकेदाराने सय्यदवाडी व येळापूर येथे गटारी बांधण्याचे काम हाती घेतले आहे.
फोटो-२२कोकरुड२ व ३
फ़ोटो : सय्यदवाडी (ता. शिराळा) येथे रसत्याच्या बाजूस आरसीसी गटर ऐवजी पाइप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.