शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शिराळ्यात गुऱ्हाळघरातील गळीत निम्म्यावर

By admin | Published: December 14, 2014 10:01 PM

घसरलेल्या दराचा परिणाम : दिवसाकाठी केवळ दोनच आदणांचे गळीत

सहदेव खोत - पुनवत -शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळातील गळिताला महिना उलटला तरीही गुळाचा दर २५०० रुपयांच्या वर जात नसल्याने गुऱ्हाळघरे अत्यंत अडचणीत सापडली असून, अनेक गुऱ्हाळघरात दिवसाकाठी केवळ दोनच आदणे निघत असल्याने कामगार व गुऱ्हाळ मालक यांचे नुकसान होत आहे.शिराळा तालुक्यातील वारणा पट्ट्यात गुऱ्हाळघरे सुरू होऊन जवळपास महिना उलटला आहे. प्रतिवर्षी गुऱ्हाळ हंगामाच्या सुरुवातीला उसदराची कोंडी फुटलेली असायची. सुरुवातीच्या महिन्यात गुळाला ३००० च्या आसपास दर मिळायचा. त्यामुळे हंगामाच्या पहिल्या महिन्यात गुऱ्हाळघरांना मुबलक ऊस मिळायचा. पहिल्या महिन्यात गुऱ्हाळांना मुबलक ऊस मिळायचा. गळितासाठी गुऱ्हाळघरांकडे शेतकऱ्यांचा ओघ वाढायचा.यावर्षी हंगामाला महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या गुळाला कऱ्हाड व कोल्हापूर बाजारपेठेत प्रतिक्विंटल १८००, २१००, २२०० ते २५००, २६०० असा दर मिळाला. यापेक्षा जादा दर मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आता गळितासाठी धजेनासे झाले आहेत. शिवाय दराच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा तोटा होऊ लागला आहे.दरात वाढ होत नसल्यामुळे दररोज चार आदणांनी चालणारी गुऱ्हाळे आता केवळ दोनच आदणांवर आली आहेत. त्यामुळे दोन लाखांवर गुंतवणूक करूनही गुऱ्हाळघरे व्यवस्थित चालत नसल्याने गुऱ्हाळ मालक हबकले आहेत. दराच्या या स्थितीमुळे कामगार ऊस उत्पादक व गुऱ्हाळ मालकांचे नुकसान होत आहे.भविष्यात गुऱ्हाळघरे टिकवायची असतील, तर शासनाने प्रतिक्विंटल ४००० च्या वर हमीभाव द्यावा. हा हमीभाव मिळाला तरच साखर कारखान्याच्या प्रतिटन दराची व गुळाच्या प्रतिक्विंटल दराची बरोबरी होऊ शकेल, असे गुऱ्हाळ मालक, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.एकंदरीत गुऱ्हाळघराबाबत शासनाची उदासीनता, अडत व्यापाऱ्यांनी केवळ स्वत:च्या फायद्याची घेतलेली भूमिका, वाढता उत्पादन खर्च व सौदे व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक यामुळे गुऱ्हाळ उद्योग आतबट्ट्यात आला असून, तमाम गूळ उत्पादकांनी, गुऱ्हाळ मालकांनी गुळाचे दर वाढविण्याची आग्रही मागणी केली आहे. गुळाला हमीभाव द्या सौदे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची गूळदराबाबत मोठी पिळवणूक होत आहे. गूळ ही जीवनावश्यक वस्तू आहे. भविष्यात गुऱ्हाळघरे टिकवायची असतील, तर शासनाने गुळाला प्रतिक्विंटल ४००० च्या वर हमीभाव द्यावा. हा हमीभाव मिळाला तरच साखर कारखान्याच्या प्रतिटन दराची व गुळाच्या प्रतिक्विंटल दराची बरोबरी होऊ शकणार आहे, असे गुऱ्हाळ मालक व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.