शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

माथाडी कायदा वाचविण्यासाठी हमाल, तोलाईदारांचा सांगलीत मोर्चा, शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

By अशोक डोंबाळे | Published: December 14, 2023 6:26 PM

'कायद्याची मोडतोड थांबवा'

सांगली : महाराष्ट्र सरकारने अन्यायकारक नवीन माथाडी कायदा / विधेयक मागे घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा हमाल पंचायतीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी हमाल, तोलाईदार, हळद महिला माथाडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. शंभर टक्के हमाल, तोलाईदार संपात सहभागी झाले होती, अशी माहिती महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मगदूम यांनी दिली.या माेर्चात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, मनोज सरगर यांनी सहभागी होऊन आंदोलनास पाठिंबा दिला. विकास मगदूम, बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर, पंचायतीचे उपाध्यक्ष प्रल्हाद व्हनमाने, संजय मोरे यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निश्चय केला. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र सरकारने अन्यायकारक नवीन माथाडी कायदा विधेयक मागे घ्यावे, यासह इतर न्याय्य हक्क मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. जिल्हा हमाल पंचायतीच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील हमाल, तोलाईदार, हळद महिला माथाडी कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.मोर्चामध्ये बाजार समितीचे संचालक मारुती बंडगर, राजाराम बंडगर, किरण रूपनर, माथाडी पतपेढीचे अध्यक्ष वसंत यमगर, बजरंग खुटाळे, भारत गायकवाड, दिगंबर तुपलोंढे, शामराव माने, महादेव रूपनर, ईनूस पटेल,  महिला आघाडीच्या शालन मोकाशी, लता मदने, मंगल शिवशरण, आदी सहभागी झाले होते.

कायद्याची मोडतोड थांबवा : विशाल पाटीलहमाल माथाडी कायदा अनेक संघर्षांतून तयार झाला आहे. या माथाडी कायद्यामुळे अंगमेहनती, कष्टकरी हमाल, तोलाईदार, महिला माथाडी कामगारांना आर्थिक व सामाजिक पत मिळाली. या कायद्यामुळे कष्टकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. याच कायद्याची महाराष्ट्र शासनाने तोडतोड करण्यास सुरुवात केली आहे. या सरकारला सामान्य जनतेच्या दुःखाची जाणीवच नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीagitationआंदोलन