शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हाक्केंची भाजपशी सलगी वाढली

By admin | Published: August 02, 2016 12:14 AM

राष्ट्रवादीत खळबळ : कवठेमहांकाळ तालुक्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार

लखन घोरपडे-- देशिंग --कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव भागातील नेते व जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के यांची सध्या भाजप नेत्यांशी जवळीकता वाढली असून, अनेक कार्यक्रमांनिमित्त तसेच एका गूढ चर्चेच्यानिमित्ताने ते एकत्र आले असल्याने हाक्केंच्या या गोष्टीमुळे राष्ट्रवादी घायाळ झाली असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.दरम्यान, हाक्के सुरुवातीला माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. परंतु तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची निर्मिती झाली आणि आर. आर. पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादीसोबत राहून हाक्के आबांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले. यानिमित्ताने तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी प्रवेश केला. परंतु आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतील अनेक नेतेमंडळी सत्तेच्या लाटेवर स्वार होऊन खासदार संजय पाटील यांच्या गटात सामील होऊन भाजपवासी झाल्याने तालुक्यात राजकीय भूकंपास सुरूवात झाली. सध्या तालुक्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच चंद्रकांत हाक्के हे भाजपचे खासदार संजय पाटील गटाशी अनेक कार्यक्रमांद्वारे एकत्र आले आहेत. शिवाय नुकत्याच झालेल्या तालुक्यातील ढालेवाडी येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता असूनही भाजपचा सरपंच करण्यासाठी हाक्के यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे हाक्के अगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी कोणता निर्णय घेणार, याकडे भागातील जनतेच्या नजरा वळल्या आहेत . दरम्यान, तालुक्यातील भाजपचे दोन गट निर्माण झाले असून खासदार संजय पाटील यांचा व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचाही एक भक्कम असा गट आहे. परंतु हाक्के हे संजय पाटील यांच्या गटाच्या संपर्कात आले आहेत. सध्या चंद्रकांत हाक्के यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने, अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. परंतु अगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच त्यांची भूमिका स्पष्ट होणार असल्याचे मत काही जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी पक्षाला तालुक्यात पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी युवक राष्ट्रवादी तसेच नूतन तालुकाअध्यक्ष यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, परंतु ढालगाव भागातून वजनदार नेते म्हणून परिचित असलेले चंद्रकांत हाक्के यांनी भाजपबरोबर घरोबा केल्यास कवठेमहांकाळ राष्ट्रवादीला पुन्हा एकदा जोरदार झटका बसणार, हे मात्र नक्की आहे.पोटासाठी सर्व काही, पर्वा कुणाची?मागील एक महिन्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी पक्षातील काही वरिष्ठ नेतेमंडळी एकत्र आले होते. त्यादरम्यान काही नेत्यांनी चंद्रकांत हाक्के यांना भाजप नेत्यांशी वाढत्या जवळीकतेविषयी छेडले, परंतु त्याला उत्तर देताना हाक्के यांनी आपल्या भाषणात पोटासाठी सर्व काही, पर्वा कुणाची?, असे म्हणून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळेच त्यांचे पुढील राजकीय धोरण काय असणार, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे