शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

विट्यात वर्धापनदिनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Published: August 10, 2016 11:36 PM

स्नेहमेळाव्यास गर्दी : ‘प्रगतीच्या वाटेवर’ विशेषांकाचे प्रकाशन; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

विटा : ‘लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाचा दशकपूर्ती वर्धापनदिन सोहळा बुधवारी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील जय मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास उपस्थिती लावून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग, व्यवसाय, शासकीय यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. बहुजनांच्या हृदयसिंहासनावर आरूढ होऊन घराघरात आणि मनामनात स्थान मिळविलेल्या ‘लोकमत’चा स्नेह हितचिंतक, स्नेही, वाचक व मान्यवरांनी यानिमित्ताने वृध्दिंगत केला.‘लोकमत’चे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन आ. अनिल बाबर, नगराध्यक्ष वैभव पाटील, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. सचिन जाधव, सौ. मेघाताई गुळवणी, माजी सभापती अविनाश चोथे, जि. प. सदस्य सुहास शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर ‘लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त खानापूर, कडेगाव व आटपाडी तालुक्यातील विविधांगी विकासाचा आढावा घेण्यात आलेल्या ‘प्रगतीच्या वाटेवर’ या संग्राह्य विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.‘लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनी भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आ. पृथ्वीराज देशमुख, युवा नेते डॉ. जितेश कदम, अशोकराव गायकवाड, अ‍ॅड. अजित गायकवाड, प्रतापराव साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, खानापूर कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख, विट्याच्या नगरसेविका सौ. प्रतिभा चोथे, सौ. स्वाती भिंगारदेवे, नगरसेवक नंदकुमार पाटील, दिलीप आमणे, अनिल म. बाबर, कृष्णत गायकवाड, खानापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बाबर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, भाई संपतराव पवार, राष्ट्रवादी युवकचे खानापूर तालुकाध्यक्ष अजित जाधव, डॉ. मानाजी कदम, विटा शहर युवक राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष नितीन दिवटे, सयाजीराव धनवडे, दीपक माळी, यश फायनान्सचे सतीश निकम, प्राथमिक शिक्षक बॅँकेचे संचालक सुनील गुरव, माजी अध्यक्ष सतीश माने, एन. पी. माने, बाजार समितीचे उपसभापती राजेश कदम, भक्तराज ठिगळे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजीराव शिंदे, तालुकाध्यक्ष संजय विभुते, विट्याच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, कडेगावचे तहसीलदार हेमंत निकम, निवासी नायब तहसीलदार एस. डी. पाटील, किशोर सानप, हिंगणगावचे अशोक जाधव, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल घोंगडे, शालिमार वॉचचे अशोकराव साळुंखे, नितीन पवार, राजू माळी, क्रांतिसिंह दूध संघाचे अध्यक्ष जयराम मोरे, आबासाहेब गुळवणी, डायमंडचे शंकर मोहिते, शिरीष पाटील, सुभाष भिंगारदेवे, कुमार लोटके, सविता पाटील, शैलजा भिंगारदेवे, जयकर शेठ साळुंखे, ग्रामसेविका एस. एन. मुल्ला, आंबेगावचे लक्ष्मण माने, संग्राम मोरे, संजय मोरे, शिवाजी पाटील, आर. आर. कुंभार, सतीश कदम, शंकरशेठ शिंदे आदींनी शुभेच्छा दिल्या. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सांगली आवृत्तीचे शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, जाहिरात विभागाचे उपव्यवस्थापक विनायक पाटील, वितरण विभागाचे शशिकांत मोरे, विटा विभागीय प्रतिनिधी दिलीप मोहिते आदींनी मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. गजानन बाबर यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)दूरध्वनीवरून शुभेच्छामाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, नागपूरचे पोलिस उपायुक्त सचिन पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, सेवानिवृत्त विक्रीकर आयुक्त अशोकराव पाटील, खानापूर सूतगिरणीचे अध्यक्ष अमोल बाबर, युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.