शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

विट्यात ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव : ‘जलक्रांती’ विशेषांकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 11:19 PM

विटा : ‘ लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाचा १२ वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवारी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील शिवप्रताप मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, शासकीय, व्यावसायिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘ लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यामुळे बहुजनांच्या हृदयसिंहासनावर आरूढ होऊन ...

ठळक मुद्देविटा विभागीय कार्यालय वर्धापनदिन स्नेहमेळाव्यास अलोट गर्दी

विटा : ‘लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाचा १२ वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवारी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील शिवप्रताप मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, शासकीय, व्यावसायिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यामुळे बहुजनांच्या हृदयसिंहासनावर आरूढ होऊन घरा-घरात आणि मना-मनात स्थान मिळविलेल्या व महाराष्टÑाचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’चा स्नेह वाचक, जाहिरातदार, हितचिंतक, स्नेही मान्यवरांनी वृध्दिंगत केला.

शुक्रवारी ‘लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यावेळी हजारो हितचिंतकांनी ‘लोकमत’ला शुभेच्छा देण्यासाठी शिवप्रताप मंगल कार्यालयात अलोट गर्दी केली होती. श्रध्देय जवाहरलालजी दर्डा बाबूजींच्या प्रतिमेस माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आ. अनिल बाबर यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करून स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त खानापूर, कडेगाव व आटपाडी तालुक्यातील आढावा घेण्यात आलेल्या ‘जलक्रांती’ या रंगीत संग्राह्य विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.

‘लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनी सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर, उपनगराध्यक्षा सौ. प्रतिभा चोथे, नगरसेविका सौ. मनीषा शितोळे, सौ. नेहा डोंबे, नगरसेवक किरण तारळेकर, ‘सोनहिरा’चे उपाध्यक्ष सयाजीराव धनवडे, गो कॅशलेस इंडियाचे डॉ. कृष्णत चन्ने, जि. प. सदस्या रेश्मा साळुंखे, पंचायत समिती सदस्य संजय मोहिते, महावीर शिंदे, सौ. कविता देवकर, सुशांत देवकर, राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख, विटा शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.

माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, बाजार समितीचे सभापती चंद्रकांत चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास पाटील, राजाराम गरूड, केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, माजी नगरसेवक दिलीप आमणे, महेश कदम, शंकरशेठ शिंदे, जयकरशेठ साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार, विट्याच्या प्रांताधिकारी सौ. अश्विनी जिरंगे, दुय्यम निबंधक सुनील पाथरवट, पशुसंवर्धक उपायुक्त डॉ. महादेव गवळी, पलूसचे सहायक निबंधक नरेंद्र लष्करे, प्राथमिक शिक्षक बॅँकेचे उपाध्यक्ष सुनील गुरव, संचालक बाळासाहेब आडके, कडेगावचे पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी, आळसंदचे अजित जाधव, नितीनराजे जाधव, बामणीचे श्रीकांत सपकाळ, शिवप्रताप पतसंस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष रणजित पाटील, वडियेरायबागचे तात्याशेठ मार्कंड, राहुल रूपनर आदींनी शुभेच्छा दिल्या.

‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सांगलीचे आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, जाहिरात व्यवस्थापक (कोल्हापूर) श्रीराम जोशी, जाहिरात विभागाचे सहायक व्यवस्थापक विनायक पाटील, विटा विभागीय प्रतिनिधी दिलीप मोहिते, इस्लामपूर विभागीय प्रतिनिधी अशोक पाटील, जाहिरात विभागाचे लक्ष्मण पाटील, चंद्रकांत चव्हाण, वितरण विभागाचे रवी बिरंजे, शशिकांत मोरे आदींनी शुभेच्छा स्वीकारल्या. गजानन बाबर यांनी सूत्रसंचालन केले.मान्यवरांच्या : दूरध्वनीवरून शुभेच्छाखासदार संजयकाका पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार विश्वजित कदम, सेवानिवृत्त विक्रीकर आयुक्त अशोकराव पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, सुधीर शेंडे, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, विटा बॅँकेचे अध्यक्ष विनोद गुळवणी, मुंबईचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील, दादा कुलकर्णी यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

‘लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी आयोजित स्नेहमेळाव्याचे उद्घाटन आ. अनिल बाबर व माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. यावेळी डावीकडून नगरसेविका सौ. मनीषा शितोळे, सौ. नेहा डोंबे, उपनगराध्यक्षा सौ. प्रतिभा चोथे, सुभाष सुर्वे, सोनहिरा कारखान्याचे उपाध्यक्ष सयाजीराव धनवडे, शंकरशेठ शिंदे, गो कॅशलेस इंडिया प्रा. लि.,चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. कृष्णत चन्ने, नगरसेवक किरण तारळेकर, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सांगलीचे शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, मनोहर चव्हाण, पंचायत समिती सदस्य महावीर शिंदे, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, कडेगाव पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र कांबळे, प्रकाश सूर्यवंशी, जाहिरात व्यवस्थापक (कोल्हापूर) श्रीराम जोशी, सहायक जाहिरात व्यवस्थापक विनायक पाटील, आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, विटा विभागीय प्रतिनिधी दिलीप मोहिते उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीLokmatलोकमत