शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

विट्यात ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 11:57 PM

लोकमत न्यूज नेटवर्कविटा : ‘लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाचा ११ वा वर्धापनदिन सोहळा बुधवारी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील शिवप्रताप मंगल कार्यालयात आयोजित स्नेहमेळाव्यास हजेरी लावून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, उद्योग, क्रीडा, शासकीय, व्यावसायिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. यानिमित्ताने बहुजनांच्या हृदयसिंहासनावर आरूढ ...

लोकमत न्यूज नेटवर्कविटा : ‘लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाचा ११ वा वर्धापनदिन सोहळा बुधवारी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील शिवप्रताप मंगल कार्यालयात आयोजित स्नेहमेळाव्यास हजेरी लावून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, उद्योग, क्रीडा, शासकीय, व्यावसायिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. यानिमित्ताने बहुजनांच्या हृदयसिंहासनावर आरूढ होऊन घरा-घरात आणि मना-मनात स्थान मिळविलेल्या ‘लोकमत’चा स्नेह वाचक, जाहिरातदार, हितचिंतक, स्नेही मान्यवरांनी वृध्दिंगत केला.‘लोकमत’चे संस्थापक थोर स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस माजी आ. सदाशिवराव पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव (दादा) पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विट्याच्या नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, प्राचार्या डॉ. सौ. मेघाताई गुळवणी, नगरसेविका सौ. मनीषा शितोळे, मीनाक्षी पाटील, प्रतिभा चोथे, आशा पाटील, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ. कविता घाडगे, सौ. लता मेटकरी, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख, पंचायत समिती सदस्य महावीर शिंदे यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करून स्नेहमेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ‘लोकमत’ विटा विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त खानापूर, कडेगाव व आटपाडी तालुक्यांतील आढावा घेण्यात आलेल्या ‘जनरेशन नेक्स्ट’ या रंगीत संग्राह्य विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.वर्धापनदिनी जि. प.चे समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, जि. प. सदस्या सौ. नीलम सकटे, पंचायत समिती सभापती सौ. मनीषा बागल, उपसभापती बाळासाहेब नलवडे, पंचायत समिती सदस्या सौ. कविता देवकर, राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, नगरसेवक सुभाष भिंगारदेवे, अ‍ॅड. विजय जाधव, अरूण गायकवाड, संजय तारळेकर, फिरोज तांबोळी, सौ. स्नेहा डोंबे, महेश कदम, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. सचिन जाधव, माजी जि. प. सदस्य सुहास शिंदे, डॉ. मानाजी कदम, सौ. स्वाती शिंदे-पवार, अ‍ॅड. महेश शानभाग, अ‍ॅड. धर्मेश पाटील, अ‍ॅड. शौर्या पवार, अ‍ॅड. विनोद गोसावी, दिलीप आमणे, भक्तराज ठिगळे, संजय भिंगारदेवे आदींनी शुभेच्छा दिल्या.मोहित्यांचे वडगावचे उपसरपंच राजूकाका मोहिते, विजय मोहिते, शिवाजीकाका मोहिते, वसंत मोरे, रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अध्यक्ष माधवराव मोहिते, डी. एच. मोहिते, प्रताप सुतार, किशोर डोंबे, लक्ष्मण पाटील, प्रशांत कांबळे, संजय सपकाळ, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास पाटील, अमृत माळी, खानापूर आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वास दळवी, हेमकुमार म्हेत्रे, गोविंद कचरे, नितीनराजे जाधव, दीपक माळी, शिवसेनेचे राजू जाधव, अ‍ॅड. संदीप मुळीक, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संतोष जगताप, सुजाता पाटील, सुजाता माने, विठ्ठल साळुंखे, अशोकराव साळुंखे, नितीन पवार, अवधूत लांब, विवेक भंडारे, प्रांताधिकारी सौ. अश्विनी जिरंगे, तहसीलदार सौ. रंजना उबरहंडे, मुख्याधिकारी महेश रोकडे, मंडल अधिकारी पाटील, जयकरशेठ साळुंखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ, आशीर्वाद मंगल कार्यालयाचे शिवाजीराव जाधव, दत्ताशेठ जाधव, रघुराज मेटकरी, अरूण लंगोटे, लेंगरेचे नितीन चंदनशिवे, सुधीर कांबळे आदींनी शुभेच्छा दिल्या.‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, उपव्यवस्थापक (प्रशासन) संतोष साखरे, जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, सांगली आवृत्तीचे शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, जाहिरात विभागाचे उपव्यवस्थापक विनायक पाटील, विटा विभागीय प्रतिनिधी दिलीप मोहिते, इस्लामपूर विभागीय प्रतिनिधी अशोक पाटील, जाहिरात विभागाचे लक्ष्मण पाटील, चंद्रकांत चव्हाण, दिलीप सूर्यवंशी, वितरण विभागाचे शशिकांत मोरे आदींनी शुभेच्छा स्वीकारल्या. गजानन बाबर यांनी सूत्रसंचालन केले.मान्यवरांच्या : दूरध्वनीवरून शुभेच्छाआ. मोहनराव कदम, सेवानिवृत्त विक्रीकर आयुक्त अशोकराव पाटील, भाजपचे गोपीचंद पडळकर, सुधीरभाऊ शेंडे, जि. प. सदस्य शरद लाड, विटा बॅँकेचे अध्यक्ष विनोद गुळवणी, महाराष्टÑ फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.