सांगली : लग्नात सासरच्या लोकांचा मानपान केला नाही व चुरमुरे फॅक्टरीसाठी १० लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची फिर्याद पीडितेने दिली आहे. याप्रकरणी अंजली महेश्वर जवळे यांनी पती महेश्वर कांतेश्वर जवळे, सासू सिंधूताई कांतेश्वर जवळे व सासरा कांतेश्वर दिगंबर जवळे (रा. माधवनगर रोड, सांगली) यांच्याविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ६ जून २०१५ पासून आजअखेर हा प्रकार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. माहेरच्या लोकांनी लग्नात व मुलाच्या बारशात सासरच्या लोकांना व त्यांच्या पाहुण्यांचा मानपान केला नाही यावरून व चुरमुरे फॅक्टरीसाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत यासाठी सासरचे लोक शारीरिक व मानसिक त्रास देत होते, असे अंजली यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहेरहून १० लाख आणण्यासाठी सांगलीत विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 12:12 PM