लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : हरिपूर-कोथळी या पुलामुळे सांगलीकरांचे १५ ते २० किलोमीटरचे अंतर वाचणार असून, प्रवास सुखकर होणार आहे, अशी माहिती आ. सुधीर गाडगीळ यांनी दिली.
आमदार गाडगीळ यांच्या प्रयत्नांनी २५ कोटी रुपये खर्च करून दोन जिल्ह्याला जोडणारा पूल अंतिम टप्प्यात आला आहे. त्या कामाची पाहणी शनिवारी गाडगीळ यांनी केली. यावेळी गाडगीळ म्हणाले की, रत्नागिरी महामार्गाला हा रस्ता जोडला जाईल. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढीलवर्षी जूनपर्यंत हा रस्ता खुला होईल. योग्य पद्धतीने मजबूत काम करण्याचे आवाहन गाडगीळ यांनी अधिकाऱ्यांना केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, शाखा अभियंता कीर्तीकुमार मिरजकर, अभय क्षीरसागर, हरिपूरचे सरपंच विकास हनबर, अशरफ वांकर, दीपक माने, विश्वजित पाटील, कृष्णा राठोड, चेतन मांडगुळकर, संतोष सरगर, रवींद्र बाबर, सतीश खंडागळे, गणपती साळुंखे उपस्थित होते.