मिरज : सांगली-मिरज शहरातील रॉकेलच्या लाभार्थी शिधापत्रिका धारकांनी गॅस कनेक्शन नसल्याचे हमीपत्र दिले नसल्याने, सर्वांकडे गॅस कनेक्शन असल्याचे गृहीत धरून फेब्रुवारीपासून सार्वजनिक रॉकेल वितरण बंद करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्र रॉकेलमुक्त करण्यात आले असून, टप्प्या-टप्प्याने ग्रामीण भागातही रॉकेल वितरण बंद होणार आहे. दोन्ही शहरात सुमारे दोन लाख लिटर रॉकेल वितरण बंद झाल्याने गरीब कुटुंबांचे हाल सुरू असून, सांगली, मिरजेतील सुमारे १५० रॉकेल विक्रेते बेरोजगार झाले आहेत.
गेल्या वर्षभरात सांगली मिरज शहरात सार्वजनिक वितरण करण्यात येणाऱ्या रॉकेल कोट्यात मोठ्याप्रमाणावर कपात करण्यात आली होती. महापालिका क्षेत्रातील सर्व गरीब कुटुंबांना व झोपडपट्टीवासीयांना उज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचा लाभ मिळाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. यामुळे रॉकेल देण्यात येणाऱ्या शिधापत्रिका धारकांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीकडे गॅस कनेक्शन नसल्याचे हमीपत्र लिहून देण्याची सक्ती करण्यात आली होती. शिधापत्रिका धारकांनी खोटी हमीपत्रे दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची तंबी देण्यात आली. यामुळे शिधापत्रिका धारकांनी हमीपत्रे दिली नसल्याने जानेवारीपर्यंत रॉकेल कोट्यात ९० टक्के कपात करण्यात आली होती.
सुमारे दोन ते तीन हजार लिटर दरमहा कोटा असलेल्या रॉकेल विक्रेत्यांना जानेवारी महिन्यात केवळ दोनशे लिटर रॉकेल वितरणासाठी देण्यात आले. यामुळे प्रतिमाणसी एक व अर्धा लिटर रॉकेल वाटप करण्यात आले. फेब्रुवारीपासून सांगली, मिरजेत रॉकेल वितरणच बंद करण्यात आले असून, दोन्ही शहरे रॉकेलमुक्त झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. रॉकेल वितरण बंद झाल्याने काळ्या बाजारात ५० रुपये प्रति लिटरने रॉकेलची विक्री सुरू असून, गरीब व झोपडपट्टीवासीयांचे हाल सुरू आहेत. ग्रामीण भागातही रॉकेल कोट्यात कपात केली आहे.निर्णयाबद्दल : ग्राहक, विक्रेत्यांतून संतापरॉकेलमुक्त शहरे करण्यासाठी सर्व गरीब कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मिळाल्याचे दर्शवून रॉकेल बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयास ग्राहकांनी व विक्रेत्यांनी विरोध दर्शवला आहे.रॉकेल दरातही मोठी वाढप्रत्येक शिधापत्रिका धारकाकडून हमीपत्र घेण्यात येणार असून, टप्प्या-टप्प्याने रॉकेल वितरण बंद होणार आहे. शिधापत्रिकेवर मिळणाºया रॉकेलचे दरही वाढविण्यात आले असून, यापूर्वी १५ रुपये लिटर मिळणाºया रॉकेलचा दर ३० रुपये प्रतिलिटर झाला आहे. रॉकेल विक्री बंद झाल्याने सांगली, मिरजेतील सुमारे दीडशे रॉकेल विक्रेते बेरोजगार झाले असून, विक्रेत्यांनी पर्यायी व्यवसाय व पुनर्वसनाची मागणी केली आहे.