सांगली : राज ठाकरे यांच्याशी युती भाजपला हानीकारक ठरु शकते. त्यामुळे भाजप कधीच त्यांच्याशी युती करणार नाही, असे मत केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी सतत उत्तरप्रदेशमधील लोकांचा अवमान केला. त्यांच्यावर हल्ले केले. परप्रांतीय म्हणून त्यांच्याशी दुश्मनी घेतली. त्यामुळेच त्याठिकाणचे लोक आता त्यांना आयोध्येस येण्यास विरोध करीत आहेत. राज ठाकरे यांनी त्यांची माफी मागावी. याशिवाय यापुढे त्यांचा अवमान करुन नये...तेव्हा काशीचे गागा भट्ट मदतीला आलेज्यावेळी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रातून कोणतेही भटजी पुढे आले नाहीत तेव्हा काशीचे गागा भट्ट मदतीला आले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या लोकांना विरोध करणे म्हणजे शिवरायांच्या इतिहासाला विरोध करण्यासारखे आहे. त्यामुळे याचा विचार राज ठाकरेंनी करावा. भाजपनेही अशा वादग्रस्त नेत्याला सोबत घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.सिलिंडरचे दर लवकरच नियंत्रणात येतीलसिलिंडर दरवाढीबाबत ते म्हणाले की, जगभरात आता सर्वच वस्तुंचे दर वाढत आहेत. लवकरच दर नियंत्रणात येतील. उज्ज्वला योजनेचा गरिबांना फायदा झाला. त्यांनी सिलिंडर घेणे बंद केल्याचे म्हणणे खरे वाटत नाही. दलित, गरिब लोकांच्या कल्याणासाठी भाजप सरकारची मोठी मदत झाली आहे. याशिवाय सामाजिक न्याय विभागामार्फत आम्हीही त्यासाठी प्रयत्न करीत आहोत. जनकल्याणाच्या अनेक योजना सरकारने राबविल्या आहेत.काँग्रेसला ७० वर्षात जमले नाहीकाँग्रेसला गेल्या ७० वर्षात महामार्गांचे जाळे विस्तारणे व विकसित करणे जमले नाहीत. केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी अवघ्या काही वर्षात हे काम केले आहे. त्यामुळे जनतेची आर्थिक प्रगती होऊन दळणवळणात सुधारणा झाली, असे आठवले यावेळी म्हणाले.
राज ठाकरेंची सोबत 'भाजप'साठी हानीकारक, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 3:57 PM