वाळवा : वाळवा गावची कन्या व अंगणवाडी क्रमांक ३११ ची विद्यार्थिनी सिनेअभिनेत्री हर्षदा बामणे व त्यांचे वडील डाॅ. शशिकांत बामणे यांनी शाळेला भेट दिली. अंगणवाडी शिक्षिका ज्योती तुपे यांनी त्यांचे स्वागत केले. एकात्मिक बालविकासच्या पर्यवेक्षिका शोभा सावंत यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माणिक पाटील, देवदास भंडारे, शैलजा थोरात, शिवाजी तुपे, बजरंग गावडे, नीता शेळके, रंजना हांडे उपस्थित होते.
हर्षदा बामणे म्हणाल्या, मी लहानपणी याच अंगणवाडीत शिकले, याचा अभिमान आहे. डाॅ. शशिकांत बामणे म्हणाले, शैक्षणिक व सामाजिक कामकाज करतानाच आई, वडील सुध्दा देवासमान आहेत, त्यांचीही सेवा करावी.
पर्यवेक्षिका शोभा सावंत व बजरंग गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्योती तुपे यांनी स्वागत केले. माधुरी भंडारे यांनी आभार मानले.
फाेटाे : १७ वाळवा १
ओळ :
वाळवा येथील शाळेस सिनेअभिनेत्री हर्षदा बामणे हिने सदिच्छा भेट दिली.