विटा : राजकीय स्वार्थासाठी एका भावाला दुसऱ्या भावाबरोबर लढाई करण्यास भाग पाडले जात आहे. धर्माच्या नावावर बटवारा करून जातीय भेदभाव निर्माण केला जात असल्याने देशाच्या अखंडतेला आज मोठा धोका निर्माण झाला आहे. क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना हाकलून देऊन ज्या विश्वासाने त्यांनी आपल्याकडे संविधान सोपविले, ते संविधान आज अशा अस्थिरता व धर्म, भाषांच्या भेदभावामुळे संकटात आले आहे. त्यामुळे क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपणांकडे सोपविलेले संविधान वाचविण्याचे मोठे आव्हान आजच्या तरूणांपुढे असल्याचे मत भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस, ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले.
विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा ‘क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार’ कॉम्रेड येचुरी यांना ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी क्रांतिवीरांगणा श्रीमती हौसाताई पाटील, अशोक ढवळे, प्रा. बाबूराव गुरव, व्ही. वाय. पाटील, प्राची दुधाणे, अॅड. सुभाष पाटील, सुभाष पवार उपस्थित होते.कॉ. येचुरी म्हणाले, सध्या देशातील आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. अन्नदात्या शेतकºयांना कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करावी लागत आहे. त्यांना कर्जमाफी देण्यास सरकारकडे पैसे नाहीत, तर दुसरीकडे साडेअकरा लाख रूपयांचे कर्ज घेऊन देश सोडून फरार झालेल्या उद्योगपतींचे साडेतीन लाख रूपयांचे कर्ज माफ केले जात आहे.
यावेळी बोलताना डॉ. आ. ह. साळुंखे यांनी, व्यक्तीच्या करिअरपेक्षा राष्टÑाची प्रगती महत्त्वाची आहे. ते काम कॉ. सीताराम येचुरी करीत आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे विचार ज्या उंचीपर्यंत होते, त्याच उंचीची व्यक्ती असलेले कॉ. येचुरी यांना पुरस्कार देण्यात आला, हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तसेच कॉ. अशोक ढवळे यांनी, गेल्या २५ वर्षात देशातील चार लाख शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. महाराष्टÑात शेतकºयांनी मागण्यांसाठी लॉँगमार्च काढला, दूध आंदोलन केले, परंतु, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. हे चित्र बदलायला हवे, असे सांगितले.अॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास देवदत्त राजोपाध्ये, नानासाहेब पाटील, इंद्रजित पाटील, स्वाती पाटील, भाई संपतराव पवार, प्रा. पी. ए. शितोळे, दिलीप सव्वाशे उपस्थित होते. विजयकुमार महिंद यांनी आभार मानले.सरकारच्या धोरणांवर टीकायावेळी येचुरी यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भारतीय संविधानात असलेले वायदे पूर्ण करण्यासाठी चांगली नीती पाहिजे. ती नीती आत्मसात केली, तर आज युवकांना शिक्षण, नोकरी देता येईल. परंतु, दररोज नवनवीन घोषणा करून लोकांना विचारातून बाहेर पडू न देण्याची तयारी मोदी सरकारने केली आहे. उत्तर प्रदेशातील मुगलसरायचे नाव बदलून पंडित दीनदयाळ असे करण्यात आले. त्यामागे राजकीय हेतू आहे. सामाजिक न्याय, आत्मिक निर्भयता, देशातील लोकशाही वाचविण्यासाठी किंवा केंद्र व राज्य सरकारमधील संघवादाचा असलेला प्रश्न संपविण्याचे मोठे आव्हान आज देशासमोर उभे ठाकले आहे. त्याचा सामना करण्यासाठी युवकांनी संविधान वाचविण्याचा संकल्प करावा, हीच क्रांतिकारकांना खरी श्रध्दांजली ठरेल, असेही येचुरी म्हणाले.