शनिवारी गाडा पुढे लावण्याच्या कारणावरून वादावादी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने भांडणे टळली. हे अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रामपंचायतीने संबंधितांना नोटीस बजावून सार्वजनिक बांधकाम विभागालाही कळविले आहे. मात्र, याकडे डोळेझाक सुरू आहे.
सेवा रस्त्यालगत वाहतुकीला अडथळा होईल अशी अनेकांची खोकी आहेत. चहा, नाष्ट्यासाठी या टपऱ्यांवर दुचाकी व चारचाकी वाहने थांबतात. त्यामुळे याचा इतर वाहनचालकांना व पादचाऱ्यांना त्रास होत आहे. यातून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत ग्रामपंचायतीने चार महिन्यांपूर्वी संबंधित खोकीधारकांना नोटीस बजावली होती; पण या नोटिसीला केराची टोपली संबंधितांनी दाखविली. याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग कक्ष यांच्याकडे कार्यवाही करण्याबाबत ग्रामपंचायतीने कळविले आहे. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही.
शनिवारी सकाळी किरकोळ कारणावरून वादावादी झाली. यानंतर संग्राम पाटील, आनंदराव शेलार, रमेश पाटील, दिनकर बाबर व पोलिसांच्या मदतीने रस्त्यावरील खोकी थोडी पाठीमागे घेतली. त्यामुळे भांडणे मिटली.
फोटो -२७१२२०२०- आयएसएलएम - कामेरी न्यूज
फोटो ओळ : कामेरी (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण केलेल्या खोकीधारकांच्यात कोणाचा गाडा पुढे, यावरून झालेल्या वादानंतर टपरी रस्त्यावर पडली. या सेवा रस्त्यालगत अनेक टपऱ्या दिसत आहेत.