शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
2
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
3
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
4
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
5
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
6
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
7
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
8
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
9
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
10
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
11
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
13
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
14
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
15
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
16
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
17
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
18
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
19
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
20
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या

Sangli: कुंडल वन अकॅडमीतील प्रशिक्षणार्थींचे आरोग्य रामभरोसे, डॉक्टरच उपलब्ध नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:46 IST

बॅचचे फिटनेस सर्टिफिकेट घेतले जाते बहिस्थ डॉक्टरांकडून

आशुतोष कस्तुरेकुंडल : कुंडल (ता. पलूस) येथील वन अकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थींचे आरोग्यच आता धाेक्यात आले आहे. तेथे पूर्णवेळ आरोग्य अधिकारी असणे गरजेचे असताना अर्धवेळ म्हणजे फक्त तीन तास अधिकारी उपस्थित असतो. भरीत भर म्हणून हे अर्धवेळ डॉक्टरही तिथे उपलब्ध नाहीत. त्यामुळे अकॅडमीत येणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.काही दिवसांपूर्वी येथे चिखलदरा वन प्रशिक्षण केंद्रातील ११० फॉरेस्ट गार्डची बॅच भेट देण्यासाठी आली होती. त्यातील जवळपास ६३ प्रशिक्षणार्थींना बाहेरील पॅकेटमधील अन्न खाल्ल्याने त्रास झाला होता. यातील काही गंभीर स्थितीत होते. त्यांना सांगलीला उपचारासाठी नेण्यात आले. पण, ज्यांना कमी जास्त प्रमाणात त्रास होता. त्यांनाही पलूस व कुंडल येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. या दरम्यान कोणताही गंभीर प्रकार घडला नाही. जर तशी परिस्थिती आली असती तर याला जबाबदार कोण? जर उशिरा उपचार झाल्यामुळे एखाद्या गार्डच्या आयुष्यावर बेतले असते तर? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.कोणतीही बॅच येथे दाखल होताना फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असते. तेही सध्या बहिस्थ डॉक्टरांकडून घेतले जाते. राज्यातील विविध विभागातील सहा जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींनाही येथे प्रशिक्षण दिले जाते.  प्रशिक्षणार्थींना सुसज्ज निवास व्यवस्था, उत्कृष्ट भोजन, व्यायामशाळा, विविध खेळ प्रकारांचीही सुविधा पुरविली आहे. पण, फक्त वैद्यकीय अधिकाऱ्याचेच का वावडे आहे ? हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे. 

२०१४ साली सुरुवात या कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनीची सुरुवात १७ फेब्रुवारी २०१४ साली झाली. दिवंगत वन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या संकल्पनेतून या प्रशिक्षण केंद्राची येथे स्थापना करण्यात आली होती. येथे प्रशिक्षणाच्या दृष्टीने कसलीही कमतरता भासू नये, याची दक्षता घेतली आहे.प्रत्येकी तीन लाख वानिकीमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रगल्भता येण्यासाठी संबंधित राज्य त्या प्रशिक्षणार्थीच्या खर्चापोटी अठरा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी तीन लाख दिले जायचे. ते आता पाच लाख झाले आहे.

वानिकी हे देश पातळीवरील प्रशिक्षण केंद्र असूनही येथील प्रशिक्षणार्थींना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी पूर्णवेळ डॉक्टर नसणे ही बाब गंभीर आहे. यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करू - आमदार अरुण लाड. 

कुंडल वन अकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थी उच्च दर्जाचे असल्याने त्यांच्यावर अकॅडमीमध्येच किमान प्राथमिक उपचार होण्यासाठी पूर्णवेळ डॉक्टर मिळावा. आणि जो अर्धवेळ सध्या कामावर नाहीत, याची माहिती मागवून लवकरच कारणे शोधू. - संग्राम थोरबोले, सामाजिक कार्यकर्ता.

वन अकॅडमीत घडलेले प्रशिक्षणार्थी

वर्ष राज्य प्रशिक्षणार्थी
२०१५महाराष्ट्र २९
२०१६/१७ गुजरात३९
२०१८महाराष्ट्र७१
२०१९महाराष्ट्र, आसाम, वेस्ट बंगाल३२
२०१९ महाराष्ट्र, उत्तराखंड ३२
२०२० मणिपूर, मध्य प्रदेश ४१
२०२१ मणिपूर, मध्यप्रदेश, मिझोराम, कर्नाटक, छत्तीसगढ ३७
२०२२आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक, छत्तीसगढ, तामिळनाडू ५२
२०२३मध्यप्रदेश ३६

 

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभागHealthआरोग्यGovernmentसरकार