शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरियाणा, जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; भाजपा मागे पडली, सुरुवातीचे कल काय...
2
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
3
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
4
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
5
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
6
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
7
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
8
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
9
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
10
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
11
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
12
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
13
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
14
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
15
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
16
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
17
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
18
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
19
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
20
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 

अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी

By admin | Published: March 10, 2016 10:40 PM

जिल्हा बॅँक : संचालकांचे निर्णयाकडे लक्ष

सांगली : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या अपात्र ठरलेल्या संचालकांनी माजी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री कपिल सिब्बल यांच्याकडे वकीलपत्र दिले आहे. शासनाच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, यावर शुक्रवारी ११ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा बॅँक संचालकांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या दहा वर्षात गैरकारभारामुळे बरखास्तीची कारवाई झालेल्या जिल्हा बँका व नागरी बँकांवरील संचालकांना दहा वर्षे निवडणूक बंदी घालण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शिक्कामोर्तब करीत वटहुकूम काढला. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील काही विद्यमान संचालकांना याचा फटका बसला आहे. कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर शुक्रवारी ११ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. मुश्रीफ व अन्य संचालकांच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, नरीमन व शिवाजी जाधव बाजू मांडणार आहेत. सांगलीतील सात संचालकांच्यावतीने प्रा. सिकंदर जमादार यांनी मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत सांगलीच्या संचालकांनाही सामावून घेण्याविषयी चर्चा झाली. शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीवर या गोष्टींचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे कोल्हापूरसह सांगलीतील संचालकांचे, सहकार विभागाचे तसेच जिल्ह्यातील नेत्यांचे लक्ष सुनावणीकडे लागले आहे. सहकार कायद्यातील बदलामुळे २०१२ मध्ये बरखास्त झालेल्या सांगली जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाला दहा वर्षे अपात्र ठरविण्यात आले आहे. यात विद्यमान सात संचालक आहेत. (प्रतिनिधी)