सांगली : सांगली जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. शहरासोबत जिल्ह्यातही विजेच्या कडकडटयासह जोरदार पावसाने झोडपून काढले. रविवार दुपारी तीन वाजल्यापासून शहरात विजेच्या कडकडाटयासह दमदार पावसाने सुरुवात केली.सुमारे तीन तासाच्या जोरदार पावसाने शहरात पाणीच पाणी झाले.सांगली शहरासह परिसरात देखील जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ओढे ,नाल्याना पाणी आले असून बळीराजा सुखावला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.मात्र मागील काही दिवसांपासून पावसाची ये-जा सुरू असल्याने पाणीप्रश्नाबाबत लोकांत समाधान व्यक्त होत आहे .
कडेगाव तालुक्यात निगडी, शिरशी परिसरात ३ वाजले पासुन पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. तसेच ढगांचा गडगडात सुरु आहे. वाकुर्ड परिसरात मुसळधार पाऊस झाला असून येलापुर, मेनी, हत्तेगांव परिसरात अती वृष्टि झाली. चांदोली धरण परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पुनवत भागात जोरदार पाऊस पडला असून भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
दुपार नंतर परत आज सायंकाळी सातच्या सुमारास विजेचा लखलखाट आणि ढगांच्या गडगड़ात येलापुर, मेणी परिसरात पावसाने पुन्हा सुरवात केली असुन मोठ्या पाऊस कोसळत आहे. या पावसाने येलापुर येथील बंधारा भरून वहात आहे. कडेगावातही विजेच्या कडकाट्यासह दमदार पाऊस कोसळला.
कडेगाव तालुक्यात कडेगाव, शिवाजीनगर, कडेपुर, देवराष्ट्रे, वांगी , चिंचणी, आसद मोहित्यांचे वडगाव, सोनकीरे, शिरसगाव, सोनसळ, पाडळी, अंबक, शिरगाव, कुंभरगाव, रामापूर, तडसर, शाळगाव आदी परिसरात दमदार पाऊस झाला .
या पावसामुळे अनेक ओढ्यांना पाणी आले आहे. यावर्षी पावसाळ्यात सुरवातीपासूनच पावसाने दडी मारली होती. मात्र आता शेवटच्या टप्प्यात पावसाने सतत हाजेरी लावत खरीप व बागायती शेतीपिकाना दिलासा मिळाला आहे. यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.