शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सांगली जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर, पुराची धास्ती कायम; कोयनेतून ५२,१०० क्युसेकने विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 12:20 PM

: सांगलीत कृष्णेची पाणी पातळी वाढण्याची शक्यता

सांगली : वारणा (चांदोली) व कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जाेर वाढल्यामुळे शुक्रवारी सकाळपासून कोयना धरणातून ५२ हजार १०० क्युसेकने विसर्ग सुरू झाला. यामुळे शनिवारी कृष्णा नदीची पाणीपातळी दोन ते तीन फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कृष्णा, वारणा नदीकाठच्या गावांमध्ये पुराची धास्ती कायम आहे.कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणीपातळी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ३९ फूट ९ इंच आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून कोयना धरणातून १० हजार क्युसेक्स विसर्ग वाढविला आहे. म्हणजे काेयनेतून ५२ हजार १०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने सातारा जिल्ह्याकरिता रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे सध्या नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी धरण व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे. पाण्याची आवक वाढल्यामुळे कोयना व इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळीमध्ये दोन ते तीन फूट वाढ होण्याची शक्यता आहे, असे पाटबंधारे विभागाने सांगितले.

वारणा धरण क्षेत्रातही संततधार पाऊस सुरूच आहे. शिराळा तालुक्यातही पावसाचा जोर कायम असल्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाऊस आणि धरणातील विसर्ग लक्षात घेतल्यास वारणा, कृष्णा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका कायम आहे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील पाच हजार १४५ लोकांचे आणि पाच हजार ५१४ जनावरांचे स्थलांतर केले आहे.

धरणातील विसर्ग (क्युसेकमध्ये)धरण - विसर्गकोयना - ५२,१००धोम - ७८५६कन्हेर - ४८४४धोम बलकवडी - १४१५उरमोडी - २९७३तारळी - ४९६०वारणा - ११,५३२

जिल्ह्यात सरासरी ८.६ मिलीमीटर पाऊसशुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३१.२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात २ ऑगस्ट रोजी पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. : मिरज २.६ (४४७), जत १.५ (२७५.३), खानापूर ७.३ (३६२.२), वाळवा १३.९ (७२१.८), तासगाव ५.३ (४४६.६), शिराळा ३१.२ (११५६), आटपाडी ४.६ (२५८.७), कवठेमहांकाळ २.३ (३८६.९), पलूस १०.९ (५०२.८), कडेगाव ८.५ (४८७).

टॅग्स :SangliसांगलीfloodपूरDamधरणKoyana Damकोयना धरण