लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कर्जमाफीच्या निर्णयाने सुखावलेल्या शेतकऱ्याला शुक्रवारी पावसानेही दिलासा दिला. जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे आठवडाभरापासून लांबलेल्या पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा करून थकबाकीदार शेतकऱ्यांना दहा हजाराचे कर्ज मंजूर केले आहे. शेतकरीवर्ग या कर्जाच्या प्रतीक्षेत असताना, त्याचे पावसाकडेही डोळे लागले होते. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून पावसाने दमदार हजेरीलावली. सकाळी दहापर्यंत पाऊस बरसत होता. वरूणराजाची कृपादृष्टी झाल्याने बळीराजा खरीप हंगामाच्या कामाला पुन्हा जोमाने लागला आहे. जून महिन्याचा पंधरवडा आला तरी जिल्"ात पावसाने हजेरी लावली नव्हती. गेल्या आठ दिवसांपासून केवळ काळे ढग जिल्"ावर होते. पण दमदार पाऊस पडलेला नव्हता. अनेक तालुक्यात तुरळक पावसाची नोंद झाली होती. शुक्रवारी मात्र बहुप्रतीक्षेनंतर वरुणराजाने जिल्"ावर कृपादृष्टी दाखविली. सकाळी आठपर्यंत मिरज तालुक्यात ७.७, जतमध्ये २१, खानापूर ११.६, वाळवा १२.५, तासगाव ८.१, शिराळा १२.५, आटपाडी २५, कवठेमहांकाळ १६.४, पलूस १९.८, तर कडेगाव तालुक्यात ११.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या पावसामुळे खरिपाच्या मशागतींना वेग येणार आहे. सांगली शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शहरातील नागरिकांची दैना उडाली होती. येथील शिवाजी मंडईत गुडघाभर पाणी होते. अनेक चौकात पाणी साचले होते, तर उपनगरांत दलदल निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेचा नियोजनशून्य कारभार उघड झाला असून नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. महापालिका प्रशासनाने काही भागात तातडीने मुरूमाची व्यवस्था करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. चांदोली धरणात १० टीएमसी पाणीसाठाचांदोली (वारणा) धरणात शुक्रवारअखेर १० टीएमसी पाणीसाठा असून, धरणाची साठवण क्षमता ३४ टीएमसी आहे. कोयना धरणामध्ये १६.७२ टीएमसी पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी, तर अलमट्टी धरणात ९.९२ टीएमसी पाणीसाठा असून, साठवण क्षमता १२३ टीएमसी आहे.
जिल्ह्यात दमदार पाऊस
By admin | Published: June 17, 2017 12:20 AM