शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
3
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
4
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
5
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
6
900% पर्यंत खटा-खट परताना देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
7
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
8
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
9
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
10
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
11
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
12
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
13
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
14
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
15
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
16
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
17
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
18
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
19
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
20
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला

मुसळधार पावसाने सांगली तुंबली; मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी, अनेक घरांत पाणी शिरले

By शीतल पाटील | Published: September 23, 2023 4:37 PM

गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठी धावपळ उडाली

सांगली : मुसळधार पावसाने शुक्रवारी सांगली जलयम झाली. शहरातील मुख्य रस्त्यासह चौकाचौकांत पाणी साचले होते. उपनगरातील अनेक घरांत पाणी शिरले. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. पावसामुळे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठी धावपळ उडाली होती.शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तास ते दीड तास पावसाने झोपडून काढले. या पावसामुळे स्टेशन चौक, काँग्रेस कमिटी, शिवाजी मंडई, झुलेलाल चौकासह विविध ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. स्टेशन चौकातील दोन्ही रस्त्यांवर पाणी आल्याने वाहनांची गती मंदावली होती. काँग्रेस कमिटीसमोरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शिवाजी मंडईतील भाजी विक्रेत्यांची पावसामुळे दाणादाण उडाली. मंडईतही दोन ते तीन फूट पाणी होते.शहरातील गटारी, नाले ओव्हरफ्लो झाले. उपनगरातील नागरी वस्तीत नाल्याचे व पावसाचे पाणी शिरले. मोकळ्या जागी तळी साचली. अनेक रस्ते पाण्याखाली गेले. घरात, अंगणात पाणी शिरले. संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपार्टमेंटमधील तळघरातही पाणी साचले होते.

किरकोळ विक्रेत्यांची तारांबळपावसाने अचानक हजेरी लावल्याने किरकोळ विक्रेते, हातगाडीचालकांची तारांबळ उडाली. येथील छत्रपती शिवाजी महाराज भाजीमंडईमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे भाजी विक्रेत्यांचे नुकसान झाले. मारुती चौक, दत्त-मारुती रस्त्यांवर किरकोळ विक्रेते मोठ्या संख्येने बसतात. गणेशोत्सवासाठी व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर स्टाॅल लावले आहेत. आरास साहित्य विक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडले आहे. पावसामुळे त्यांची धावाधाव झाली.

गणेश मंडळ कार्यकर्त्यांची धावाधावपावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थाच कोलमडल्याने गणेशोत्सवात गणेश मंडळांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अजूनही काही मंडळांकडून देखाव्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. त्यात पावसाने हजेरी लावल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांची त्रेधातिरपीट उडाली.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस