वारणावती : चांदोलीत आज, बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली. पाणलोट क्षेत्रातून १२ हजार ३६८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातीलपाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली. गेल्या २४ तासांत ९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर एक टीएमसीने धरणातीलपाणीसाठा वाढला आहे. दोन मीटरने पाणी पातळीत वाढ झाली आहे.चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणलोट क्षेत्रातून १२ हजार ३६८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात १२.४७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणी पातळी ५९९.६५ मीटर झाली आहे. धरणातून ६४६ क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू आहे.पावसाळ्यामुळे येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच चांदोली धरण पाहण्यासाठी बंदी आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरकपारीतील धबधबे कोसळू लागले आहेत. त्यामुळे धबधब्या स्थळावर पर्यटकांचा ओढा वाढत आहे.
चांदोलीत सलग दोन दिवस अतिवृष्टी, धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 3:38 PM