शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

शिराळ्यासह वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी; अनेक पूल पाण्याखाली

By अशोक डोंबाळे | Published: August 09, 2022 8:22 PM

वारणा धरणातून ५६२८ क्युसेकने विसर्ग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: शिराळा तालुक्यासह कोयना, वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. शिराळा तालुक्यात ७० मिलीमीटर तर वारणा (चांदोली) धरण क्षेत्रात १३० आणि कोयना धरण क्षेत्रात १७५ मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. वारणा धरणातून ५६२८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली गेले असून कृष्णा दुथडी भरून वाहत आहे.

जिल्ह्यात चार दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी दिवसभरात वारणा धरण क्षेत्रात ३७, तर कोयना धरण क्षेत्रात ९२ मिलीमीटर पाऊस झाला. वारणा धरणात ३०.५३ टीएमसी पाणीसाठा असून ८९ टक्के धरण भरले आहे. यामुळे धरणातून पाच हजार ६२८ क्युसेकने विसर्ग होत आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. कोयना धरण ७२ टक्के भरले आहे. कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर असल्यामुळे कृष्णा नदीची पातळी दिवसात नऊ फुटांनी वाढून मंगळवारी सायंकाळी आयर्विन पूल येथे १९ फूट झाली होती. वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव, जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे.

अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग- अलमट्टी धरणात ७९ हजार ४९२ क्युसेकने पाण्याची आवक होत असून ११७.३७ टीएमसी म्हणजे ९४.४६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे त्यातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.

कृष्णा नदीची जिल्ह्यातील पाणीपातळी (फूट इंचामध्ये)कृष्णा पूल कराड- १३.०९ताकारी- २२.०३भिलवडी पूल- २१.०१आयर्विन- १९अंकली- २३.०६म्हैसाळ- ३१राजापूर बंधारा- ३२.११

धरणातील पाणीसाठा

धरण - क्षमता - सध्याचा पाणीसाठा - टक्केवारीअलमट्टी - १२३ - ११७.१९ - ९४.४६ टक्केकोयना - १०५.२३ - ७५.४८ - ७२ टक्केवारणा ३४.२० - ३०.५३ - ८९ टक्के

टॅग्स :RainपाऊसSangliसांगलीDamधरणMaharashtraमहाराष्ट्र