शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

मुसळधार पावसाने सांगली शहराला झोडपून काढले, दोन तासांतच ६१.५ मि.मी.ची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 4:38 PM

‘सिव्हिल’ चौकात वाहतूक कोंडी

सांगली : शहर व परिसरात रविवारी रात्री ६१.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक पाऊससांगली शहरात पडला असून, शहरातील प्रमुख रस्ते, चौक अन् उपनगरांना पडलेला पाण्याचा विळखा साेमवारीही घट्ट राहिला.ढगांच्या गडगडाटासह रविवारी रात्री मुसळधार पावसाने सांगली शहराला झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत पाऊस कायम होता. दोन तासांतच ६१.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शहर जलमय झाले. सोमवारी सकाळी पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने सांगलीतील अनेक भाग पाण्यातच राहिले.सांगलीच्या शासकीय रुग्णालयासमोरील रस्ता, काँग्रेस भवन, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या पूर्व बाजूचा उत्तर शिवाजीनगरचा रस्ता, रतनशीनगर, जुना बुधगाव रस्ता, शिवाजी मंडई, लक्ष्मी देऊळ परिसर, महात्मा गांधी कॉलनी, आदी भागातील रस्ते, चौक पाण्यात गेले. सोमवारी दिवसभर या भागातील पाणी कायम होते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून कसरत करीत शाळा गाठावी लागली.

‘सिव्हिल’ चौकात वाहतूक कोंडीसांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोरील चौकात सोमवारी दुपारी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. वीस मिनिटे वाहतूक ठप्प होती. शासकीय रुग्णालयापासून शंभर फुटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीची कोंडी झाली.

नाले, गटारींवर अतिक्रमणांचा परिणामसांगलीत अनेक रस्ते तसेच उपनगरांमधील गटारी, नाल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे पावसाळी पाणी निचरा होण्यास अडथळे येत आहेत. जुना बुधगाव रस्ता, महात्मा गांधी काॅलनी, कुपवाड रोडला यामुळे पाणी साचून राहण्याची समस्या निर्माण झाली आहे.

कुठे किती पाऊस? (मि.मी.)सांगली ६१.५बुधगाव ५७कवलापूर २९.८कसबे डिग्रज ५७कवठेपिरान ५७.८कुपवाड ५९

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस