फोटो ओळ : बावची (ता. वाळवा) येथे मृत कर्जदार लालासाहेब लोंढे यांच्या विम्याची रक्कम त्यांची कन्या दीपाली लोंढे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी विराज शिंदे, माणिक शेळके, संस्थेचे संस्थापक विजयराव यादव, उदयराव यादव उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) येथील स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलरावदादा पतसंस्थेतर्फे मृत कर्जदाराच्या वारसाला विम्याची रक्कम सुपूर्द करण्यात आली. विराज शिंदे, माणिक शेळके, संस्थेचे संस्थापक विजयराव यादव, अध्यक्ष उदयराव यादव यांच्या हस्ते ही रक्कम देण्यात आली. भडकंबे येथील लालासाहेब शंकर लोंढे हे संस्थेचे कर्जदार होते. त्यांचा काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. संस्थेने कर्जदारांचाही विमा उतरला आहे. त्याचा एक लाख रुपयांचा धनादेश राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, माणिक शेळके, संस्थेचे संस्थापक विजयराव यादव, अध्यक्ष उदयराव यादव यांच्या हस्ते लालासाहेब यांची कन्या दीपाली लोंढे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सरपंच वैभव रकटे, अनिल शिंगारे, नितीन पाटील, बाजीराव अनुसे, सुनील जाधव, बाळासाहेब मस्के, मानसिंग पाटील, सचिव श्रीकांत देवर्डे उपस्थित होते.