इस्लामपूर येथे आचार्य जावडेकर गुरुकुलातील १२ विद्यार्थ्यांच्या शालेय फीचा धनादेश कोमल बनसोडे यांनी मुख्याध्यापिका कल्याणी पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा देत येथील नगरसेविका कोमल अशोक बनसोडे यांनी आचार्य जावडेकर गुरुकुलातील १२ विद्यार्थ्यांचे शालेय शैक्षणिक शुल्क मुख्याध्यापिकांकडे जमा करून सामाजिक उत्तरदायित्व जपले.
आचार्य जावडेकर गुरुकुलात झालेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कोमल बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श विचार जोपासायला हवेत, स्त्रीमुक्तीसाठी आणि स्त्रियांना सन्मानाने जगण्यासाठी संविधानामध्ये त्यांनी केलेली तरतूद भारतीय महिलांसाठी अभिमानास्पद आहे.
गुरुकुलातील १२ विद्यार्थ्यांच्या शालेय फीचा धनादेश बनसोडे यांनी मुख्याध्यापिका कल्लाणी पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी कुमार खोत, रूपाली जाधव, श्रावणी पाटील, अभिजित मोरे, मधू कोळी, जान्हवी गायकवाड, आयुष कांबळे, सविता खवळे, तमन्ना नायकवडी उपस्थित होत्या.