लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना काळात जेवणासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. अशा काळात उत्कर्ष भोजनालय व हिंदवी फाउंडेशनने मदतीचा हात दिला आहे. शहरातील डॉ .पतंगराव कदम कोविड केअर सेंटर व आरोग्य विश्व कोविड सेंटर या दोन्हींमधील दोनशेहून अधिक जणांची मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सांगलीत नगरसेवक अभिजित भोसले व मंगेश चव्हाण यांनी कोविड सेंटर सुरू केले आहे. भोसले यांच्या कदम कोविड सेंटरमध्ये २७ एप्रिलपासून, तर चव्हाण यांच्या आरोग्यविश्व सेंटरमध्ये ८ मेपासून उत्कर्ष भोजनालय व हिंदवी फाउंडेशन यांच्या मदतीने दोनशे लोकांना दोनवेळच्या जेवणाची मोफत सुविधा देण्यात आली आहे. विजय खेत्रे, धनंजय वाघ, अभिजित कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू आहे.