लोकमत न्यूज नेटवर्कवाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा साखर कारखान्यास गतवर्षी गाळपास आलेल्या उसाला प्रति टन ३,३२५ रुपये दर देणार आहे, अशी माहिती अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली. राज्य शासनाची परवानगी घेऊन हे बिल ४ आॅक्टोबरला शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.हुतात्मा साखर कारखाना अधिमंडळाच्या ३७ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी अध्यक्ष महादेव कांबळे, माजी अध्यक्षा नीलावती माळी, संचालिका आक्काताई गावडे, शालन रकटे प्रमुख उपस्थित होते.नायकवडी म्हणाले, देशात अतिरिक्त साखर असतानाही केंद्र सरकारने गेल्यावर्षी ५ लाख व यावर्षी ३ लाख टन साखर आयात केली. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला. हुतात्मा कारखाना बायंडिंग मटेरियलसह शेतकºयांना उच्चांकी ऊसदर देत आहे. त्यामुळे बायंडिंग मटेरियलचा एक टक्काप्रमाणे प्रत्यक्ष ३३.२५ रुपये दर शेतकºयांना वाढवून मिळतो. परंतु कारखान्याचे प्रतिटन ४.२५ तोडणी व वाहतूक खर्च वाढतो. रिकव्हरीत घट सोसावी लागते. त्यामुळे प्रतिटन ४१.७९ पैसे नुकसान होते. कारखान्याची गतवर्षीची एफआरपी प्रतिटन २,७२० रुपये असताना, प्रत्यक्ष बायंडिंग मटेरियलसह ३,३२५ रुपये दर देत आहोत. १ ते १५ मार्चदरम्यान गाळपास आलेल्या उसाला ३,४०८ रुपये, १५ मार्च ते ३१ मार्चदरम्यान गाळपास आलेल्या उसाला ३,४३९ रुपये, तर १ एप्रिलच्या पुढील उसाला ३,४५९ रुपये दर देणार आहे.यातून मुख्यमंत्री निधी प्रतिटन ४ रुपये, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेसाठी १ रुपया, साखर संघासाठी १ रुपया व भागविकास निधीसाठी प्रतिटन ४४ रुपये, याप्रमाणे एकूण ५० रुपये कपात करण्यात येईल.यावेळी साखर उद्योगाचे व ऊस उत्पादनाचे ५ वर्षांसाठी स्थिर धोरण असावे, एफआरपीपेक्षा जादा दिल्या जाणाºया ऊसदरावर आयकर आकारला जाऊ नये, कारखान्याच्या स्वत: चालविलेल्या ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी प्रती युनिट १ रुपया २० पैसे आकारणी केली जाते, ती करण्यात येऊ नये, पॉवर पर्चेस अॅग्रिमेंट जुन्या दराने पीपीए करुन घ्यावेत, हे चार ठराव करण्यात आले.प्रभारी कार्यकारी संचालक दीपक पाटील यांनी स्वागत केले. ऋण व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी हिशेबपत्रके सादर केली.यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.इथेनॉल प्रकल्पाचे २० कोटी फेडलेनायकवडी म्हणाले, ‘हुतात्मा’मुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांमध्ये जागरुकता निर्माण झाली. महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांना शेतकºयांना ऊसदर देणे भाग पडले. हुतात्मा साखर कारखाना म्हणजे आपल्या भाकरीचा प्रश्न आहे. साखर कारखाना सभासदांना दर महिन्याला १५ किलो साखर ४ रुपये किलो दराने देतो. तसेच दीपावलीसाठी जादा १० किलो साखर देतो. या कमी दराच्या साखरेसाठी कारखान्याला १ कोटी ५७ लाख रुपये कर भरावा लागतो. त्यामुळे ६ कोटी ७५ लाख रुपयांचा बोजा कारखान्याला सहन करावा लागतो. गत हंगामात इथेनॉल प्रकल्पाची चाचणी झाली आहे. प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच त्यासाठी घेतलेले २० कोटीचे एनसीडीटीचे कर्ज भागविले आहे.
‘हुतात्मा’चा ३,३२५ रुपये उच्चांकी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:29 PM