सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या बेदाणा सौद्यांमध्ये शिंदगी येथील शेतकऱ्याच्या बेदाण्यास २०० ते २११ रुपये प्रतिकिलो असा उच्चांकी दर मिळाला. मार्केट यार्डातील अरायना ट्रेडिंग कंपनी पेढीमध्ये शिंदगी (जि. विजापूर) येथील शेतकरी अकबर अबुबकर खतीब यांच्या बेदाण्यास हा दर मिळाला. दत्त ट्रेडर्स यांनी हा बेदाणा खरेदी केला.या आठवड्यात बाजार समितीत ५० हजार ७६८ बॉक्स आवक झाली असून, कमीत-कमी दर १०० रुपये, तर जास्तीत-जास्त २११ रुपये दर असून, सरासरी १६५ रुपये दर बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे.
शेतकऱ्यांनी आपला बेदाणा विक्रीसाठी बाजार समितीत आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, प्रभारी सचिव व्ही. जे. राजेशिर्के, सहसचिव आर. ए. पाटील, जे. के. पाटील यांनी केले आहे. ज्या शेतकऱ्यांना बेदाणा व हळद तारण कर्जाची गरज आहे, त्यांनी बाजार समितीशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.