शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सांगली जिल्ह्यात आढळली अतिविषारी घोणस अळी, अंबकच्या तरुणीस दंश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 12:21 PM

शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण

कडेगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत असलेली अतिविषारी घाेणस अळी रविवारी सांगली जिल्ह्यातही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंबक (ता. कडेगाव) येथील अश्विनी नंदकुमार जगदाळे (वय २०) या तरुणीस रविवारी दुपारी घाेणस अळीने दंश केला. यामुळे तीव्र वेदना हाेऊन तिचा पाय सुजला आहे. तिला उपचारासाठी चिंचणी (ता. कडेगाव) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.लोकरी मावा, हुमणी आणि गोगलगाय अशा अळी व किडींच्या संकटाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अतिविषारी अळीच्या प्रादुर्भावामुळे नवे संकट उभे राहिले आहे. दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहेत. या वातावरणातील बदलांचा परिणाम पिकांवर होत आहे. पिकांवर विविध प्रकारची कीड पडत आहे. काही दिवसांपूर्वी घोणस नावाच्या अळीचा प्रादुर्भाव समाेर आला हाेता. ही अळी गवतावर आणि ऊसावर पाहायला मिळते. तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवरदेखील होत आहे.काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याला घोणस अळीने दंश केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले हाेते. आणखी काही ठिकाणीही घाेणस अळीच्या दंशाच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता हे संकट सांगली जिल्ह्यातही आल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.अंबक येथील अश्विनी नंदकुमार जगदाळे ही युवती रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घराबाहेर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेली होती. यावेळी गवतात असलेल्या घोणस अळीवर तिचा पाय पडला. अश्विनीच्या तळपायाला अळीने दंश केला. अळीच्या अंगावरील काटे अश्विनीच्या तळपायाला टोचले. यानंतर वेदना असह्य झाल्याने तिला चिंचणी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.यानंतर पुढील उपचारासाठी चिंचणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अश्विनीच्या आईने ही अळी प्लास्टिकच्या पिशवीतून डॉक्टरांना दाखवण्यासाठी रुग्णालयात आणली होती. यामुळे ती घोणस अळी असल्याचे स्पष्ट झाले. राज्यभरात चर्चेत असलेल्या या अळीची आजवर सांगली जिल्ह्यात नाेंद नव्हती. रविवारी घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी