सांगली : सांगलीतील पैलवान खानावळ म्हणून नावारूपाला आलेले उत्कर्ष भोजनालयाचे संचालक विजय खेत्रे यांनी आजवर हजारो गरजूंना मदत केली आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या संकटात हॉटेल व्यवसाय बंद असला तरी भुकेल्यांसाठी उत्कर्ष नेहमी खुले असते. अन्न, धान्य, कपडे, फळे, भाजीपाला आदींच्या माध्यमातून त्यांची सामाजिक सेवा अखंड सुरु आहे.
लाल मातीत कसरती करणाऱ्या तरुण पैलवानांच्या पाठीवर मदतीचा हात ठेवत त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी हिंदवी फाउंडेशन व उत्कर्ष भोजनालय मार्फत सांगलीतील पैलवानांना सर्व खुराकाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विजय खेत्रे, हिंदवी फाउंडेशनचे संस्थापक अभिजीत कोळी, पश्चिम महाराष्ट्र शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ. किशोर ठाणेकर, नगरसेवक अभिजीत भोसले, धनंजय प्रकाशन अध्यक्ष धनंजय वाघ, कुस्ती निवेदक जोतीराम वाजे, ओंकार नागरी पतसंस्थेचे चेअरमन विनायक खेत्रे, शहाजी पवार, सुनील पाटील, दिग्विजय आवटी, गणेश पवार, किरण शिंदे आदी उपस्थित होते.