लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘आंतरजिल्हा बदली’ला मान्यता मिळालेल्या २४९ शिक्षकांना अजूनही कोल्हापूर जिल्हा परिषदेने न सोडल्याने हवालदिल झालेल्या शिक्षकांनी गुरुवारी दिवसभर जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मारला. दिवसभर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी फेऱ्या मारणाऱ्या या शिक्षकांना अखेर दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने उद्या याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. गेली अनेक वर्षे जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना यंदा बदलीची संधी मिळाली. रोस्टर, बाहेरून येणाऱ्या शिक्षकांची मागणी, अन्य निकष आणि नियमांमधून सुटका होत अखेर २४९ शिक्षकांच्या मागणीप्रमाणे बदल्या करण्याचा निर्णय झाला. संबंधित शिक्षकांना तातडीने सोडावे, असे आदेशही गेल्या चार दिवसांत देण्यात आले आहेत. मात्र, आपल्या जिल्ह्यात शिक्षक कमी पडतील या भीतीने कोणत्याही जिल्हा परिषदेने आहे त्या शिक्षकांना न सोडण्याची भूमिका घेतली होती. गेले दहा दिवस बदल्या झालेले शिक्षक जिल्हा परिषदेत येरझाऱ्या मारत आहेत. गुरुवारी सकाळी मोठ्या संख्येने हे शिक्षक जिल्हा परिषदेसमोर जमले. सांगली, सातारा, सोलापूरपासून अगदी नागपूर, औरंगाबादपर्यंतच्या जिल्ह्यात जाणाऱ्या शिक्षकांचा आता संयम सुटायला लागला आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास तीस, चाळीस शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना भेटण्यासाठी निघाले. मात्र, डॉ. खेमनार बैठकीला पुण्याला गेल्याचे समजल्यानंतर या सर्वांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांना भेटण्याचा निर्णय (पान ६ वर) त्याअंतर्गत विना अनुदानित शाळांतील शिक्षकांनी भजन आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या कृती समितीच्या शिष्टमंडळासमवेत मुंबई येथे चर्चा केली. त्यात त्यांनी कृती समितीच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन गांभीर्याने विचार करत आहे शिवाय येत्या अधिवेशनामध्ये या मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येतील. त्यामुळे हे आंदोलन कृती समितीने मागे घ्यावे, असे आवाहन केले. त्यावर समितीने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. मुलं गावाकडं :आता गावाकडच्या जिल्ह्यात बदली होणार म्हणून अनेक शिक्षिकांनी आपल्या लहान मुलांना तिकडेच आई-वडिलांकडे किंवा सासू-सासऱ्यांकडे ठेवले आहे. १५ जूनच्या आधीच या बदल्या होतील असे वाटत असताना १५ जुलै आला तरी बदल्या नसल्याने या शिक्षिका हवालदिल झाल्या आहेत. काही महिला तर लहान मुलांना मांडीवर घेऊन जिल्हा परिषदेच्या आवारात बसून होत्या.
‘आंतरजिल्हा बदली’ झालेले शिक्षक हवालदिल
By admin | Published: July 07, 2017 1:10 AM