खानापूर : ऐतिहासिक बाणूरगडचा इतिहास सर्वज्ञात आहे. पुढील काळात बाणूरगडास पर्यटन स्थळ, तसेच सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी बाणूरगड (ता. खानापूर) येथे केले.
बाणूरगड येथील विविध विकासकामांचा प्रारंभ आमदार बाबर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या नीलम सकटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुहास शिंदे, सरपंच सज्जन बाबर, राजाभाऊ शिंदे, माजी उपसभापती दादासाहेब पाटील उपस्थित होते.
बाणूरगड येथील जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत (१४.५ लाख), बहिर्जी नाईक समाधीकडे जाणारा रस्ता (१३.५ लाख), हनुमान मंदिरासमोर पेव्हिंग ब्लाॅक बसविणे (५ लाख), चौदाव्या वित्त आयोगातून वाॅटर एटीएम (२.६४ लाख), सामाजिक सभागृहाच्या समोर पेव्हिंग ब्लाॅक बसविणे (५ लाख), खंडोबा मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लाॅक बसविणे व अंतर्गत दुरुस्ती (२.९९ लाख) आदी विकासकामांचा प्रारंभ आमदार बाबर यांच्या हस्ते करण्यात आला.
याचवेळी सरपंच सज्जन बाबर यांचा वाढदिवसानिमित्त आमदार बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास खरेदी - विक्री संघाचे संचालक पोपट माने, खानापूरचे नगराध्यक्ष तुषार मंडले, हिवरेचे सरपंच रामकृष्ण सुतार, ताडाचीवाडीचे सरपंच अनिल मंडले, करंजेचे माजी सरपंच दिलीप माने, महेश माने, प्रभुराज चव्हाण, संभाजी जाधव, पांडुरंग खोत, उमेश जाधव, राहुल बाबर, रायसिंग मंडले, ग्रामसेवक विनय थोरवत उपस्थित होते. प्रदीप गायकवाड यांनी आभार मानले.
फाेटाे : २७ खानापुर१