शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
2
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
3
"अमित शाह सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल", भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं विधान
4
Investment tips : १० हजारांवरून १० कोटी कसे मिळवायचे? 'धनकुबेर' बनण्याचा फॉर्म्युला समजून घ्या
5
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
7
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
8
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
9
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
10
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
11
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
12
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
13
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
14
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
15
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
16
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
17
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
18
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
19
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
20
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती

धर्माबरोबरच इतिहासाचे विभाजन धोक्याचे: तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:22 PM

सांगली : आपले गट तयार करून त्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात महापुरूषांच्या विचारांच्या विरोधकांना रान मोकळे करून दिले जात ...

सांगली : आपले गट तयार करून त्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात महापुरूषांच्या विचारांच्या विरोधकांना रान मोकळे करून दिले जात आहे. आपले लोक उपेक्षित राहिले तरच आपला विकास होईल, हा घातक विचार पेरला जात आहे. महापुरूषांच्या विचारांना पुतळ्यांमध्येच बंदिस्त करून ठेवत धर्माबरोबरच इतिहासाचेही करण्यात येत असलेले हे विभाजन धोकादायक आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी फौंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त तुषार गांधी यांनी रविवारी सांगलीत केले.प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरमच्यावतीने आयोजित मार्क्स, गांधी, आंबेडकर यांचा ‘राष्टÑवाद’ संकल्पनेवरील विचारमंथनात बीजभाषणावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनीही या विषयावर परखडपणे आपली मते व्यक्त केली.गांधी म्हणाले, महापुरूषांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या कार्यकर्त्यांना परस्परात लढवून आपला हेतू साध्य करण्यासाठी काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळेच पुतळ्यांच्या उंचीबरोबरच त्या बांधणाºयांच्याही उंचीच्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. गांधी व आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद जरूर होते. मात्र त्यांच्यात वैमनस्य नव्हते. तरीही त्यांच्यातील मतभेद, वैमनस्यच अधिक प्रकर्षाने दाखविण्यात काहीजण आघाडी घेत आहेत. एकमेकांच्या विचारांचा तिरस्कार न करता त्यांचा आदर ठेवून काम केल्यासच या विरोधकांना चपराक बसणार आहे. धर्माच्या विभाजनाबरोबरच इतिहासाच्या विभाजनाचे कटकारस्थान रचले जात असून, सर्वांनीच सजग राहिले पाहिजे. त्यांच्यातील मतभेदांपेक्षा त्यांच्या समाजविषयक कार्यावर सर्वांनी विचार करायला हवा.राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले, अलीकडे राष्टÑवादाचा बोलबाला सुरू झाला असला तरी, दुर्दैवाने कोणालाही राष्टÑवाद समजलेलाच नाही. रोजच्या जगण्याबद्दल, समस्यांबद्दल बोलले तरी त्याला राष्टÑद्रोही ठरविले जात आहे. आपल्या समुदायापुरता, समाजापुरता महापुरूषांनी कधीच विचार केला नव्हता. राष्ट्रवादाच्याविरोधात नक्षलवादाला पुढे केले जात आहे. राष्टÑवादाचे खरे भान आजही आपल्या देशाला आहे असे वाटत नाही. त्यामुळेच आजच्या सत्ताधाºयांना गांधी व आंबेडकरांचे विचार पुसून टाकायचे आहेत. गांधींनी नेहमीच राष्टÑवाद हा शब्द न वापरता रामराज्य हा शब्द वापरला आहे. गांधींचा राम आणि गोळवळकरांच्या डोक्यातील राम यात फरक असून, पुरोगामी विरोधकांकडून गांधींबद्दल चुकीचे चित्र रंगविले जात आहे. मार्क्स, गांधी व आंबेडकरांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या भल्याचा विचार केला. तिघांचे भाव वेगळे असले तरी, त्यांची राष्टÑवादाची संकल्पना अधिक व्यापक होती.प्रारंभी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पोळ व राणी यादव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सनतकुमार आरवाडे, दिनकर साळुंखे, तानाजीराव मोरे, सुरेश पाटील, बी. आर. थोरात, अजित सूर्यवंशी उपस्थित होते.भक्तांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनीगांधी म्हणाले, महापुरुषांना विशिष्ट विचारात, जातीत बंदिस्त करण्यातच त्यांच्या भक्तांनी धन्यता मानली. या महापुरुषांच्या विचारांचा अवलंब न करता केवळ त्यांचा उदोउदो करून भक्तीचाही व्यापार बनवित भक्ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनविली आहे. मार्क्स, गांधी आणि आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याऐवजी गांधी म्हणजे खादी, आंबेडकरवादी म्हणजे निळा रंग, मार्क्स म्हणजे गळ्यात अडकविलेली बॅग हा युनिफॉर्म अंगिकारण्याकडे भक्तांचा ओढा वाढला आहे. याचा पुरेपूर फायदा घेत दुसºया शक्तींनी महामानवांचे विचार पुसून टाकण्याचे काम चालू केले आहे.ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे म्हणाले, ज्या राष्टÑात दरवर्षी चार लाख शेतकरी आत्महत्या करत असताना, तीन लाख मुली गर्भाशयात मृत होत असताना ते राष्टÑ रामराज्य कसे, असे असू शकेल? आजच्या राजकीय परिस्थितीत राष्टÑवादाचा विचार मांडणाºयांना देशद्रोही ठरविले जात आहे. राज्यघटनेला चकवा देत समांतर यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भगव्या कपड्यातील लोक सत्तेवर आल्यावरच राष्टÑवादाला धोका निर्माण झाला आहे.