सुनील देशपांडे व राहुल नागणे बँकेच्या सोने गहाण कलम बांधणीच्या कामानिमित्त लॉकर रूममध्ये गेले होते. दरम्यान, शिपाई राहुल नागणे यास लॉकरच्या खाली अंगठी पडल्याचे निदर्शनास आले. ती अंगठी देशपांडे यांना दाखविली.
सुनील देशपांडे व वरिष्ठ बँक अधिकारी शकील तांबोळी यांनी अंगठी कोणाची आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. लॉकरसाठी कोणते ग्राहक आले, याची तातडीने माहिती घेऊन प्रत्येक ग्राहकाला त्यांनी फोनवरून संपर्क साधला. बँकेचे ग्राहक अण्णासाहेब भोसले यांची अंगठी असल्याची खात्री झाली. त्यानंतर त्यांना बोलावून ती अंगठी बँकेचे सल्लागार डॉ. प्रशांत रावण, शकील तांबोळी यांच्याहस्ते परत करण्यात आली. राहुल नागणे यांनी अंगठी परत दिल्याने समाजात प्रमाणिकपणा शिल्लक असल्याचा प्रत्यय आला.
यावेळी बँकेचे अधिकारी शकील तांबोळी, वैभव शिनगारे, विशाल माळी, उर्मिला मोरे उपस्थित होते.
फोटो-१४दिघंची०१
फोटो ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथे विटा मर्चंट बँकेत ग्राहकांची सोन्याची सापडलेली अंगठी परत करण्यात आली. यावेळी डॉ. प्रशांत रावण, शकील तांबोळी, सुनील देशपांडे, राहुल नागणे आदी उपस्थित होते.