शिराळा : येथील पोलीस मैदानावर प्रजासत्ताक दिनी प्रशासकीय ध्वजारोहण कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि वीरपिता यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार आयुशी सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
कोरोना काळात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. डी. राजमाने, डॉ. प्रकाश मोरे, डॉ. राहुल मोरे, समुदाय आरोग्य अधिकारी अजिंक्य दोरकर, आरोग्य सहाय्यक एस. बी. पाटील, आरोग्य सहाय्यक एस. जी. खोत, आरोग्य सेविका ए. व्ही. पाटील, जे. एस. चौगुले, आशा स्वयंसेविका आर. ए. जाधव, परिचारिका सुनिता फाळके, दीपाली कांबळे आणि जीवन रणदिवे, अविनाश कांबळे तसेच वीरपिता आनंदा कांबळे व वीरपत्नी सिंधू नाकील यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगराध्यक्षा सुनीता निकम, मुख्याधिकारी योगेश पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने, डॉ. प्रवीण पाटील, सुनंदा सोनटक्के, सीमा कदम, राजेश्री यादव आदी उपस्थित होते.
फोटो-२८शिराळा१