गेल्या २५ वर्षांतील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रांत त्यांचे योगदान मोठे आहे. आजवर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ७७ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील विविध १३ पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत. त्यांचे ७ कवितासंग्रह, पाच निबंध व भाषणसंग्रह, समीक्षाग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. अनेक विद्यापीठातून त्यांच्या कविता व पुस्तके अभ्यासक्रमात घेण्यात आलेली आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या या योगदानाची नोंद घेऊन ऑस्ट्रेलियन विद्यापीठाने त्यांना मानद डिलीट ही पदवी सन्मानाने बहाल केली आहे. प्राथमिक शिक्षिकेने मिळविलेली ही शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच प्रेरणादायी आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फोटो-०८विटा१
फोटो : विटा येथील साहित्यिक स्वाती शिंदे-पवार यांना ऑस्ट्रेलियन विद्यापीठाने मानद डिलीट पदवी देऊन सन्मानित केले. यावेळी त्यांच्यासोबत पती अनिल पवार, मुले अक्षरा व शब्दम उपस्थित होते.