इस्लामपूर येथे सफाई कामगारांचा सन्मान दादासाहेब पाटील, प्रा.शामराव पाटील, शहाजीबापू पाटील, विश्वनाथ डांगे, एम. जे. पाटील, सुनीता सपकाळ, संगीता कांबळे, सचिन कोळी, रफिक पठाण, सागर चव्हाण, राजाराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आपण स्वच्छतेच्या माध्यमातून समाजसेवा, देशसेवा करीत असून, समाजाचे आरोग्य जपताना स्वत:च्या, कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या, अशा आशयाचे पत्र मास्क व सॅनिटायझर देऊन इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. युवानेते प्रतीक पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रा.शामराव पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.नरसिंह देशमुख, नगरसेवक विश्वनाथ डांगे, सुनीता सपकाळ, संगीता कांबळे यांच्याहस्ते नगरपालिका व उपजिल्हा रुग्णालय आवारात हे वाटप करण्यात आले.
शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, पालकमंत्री जयंत पाटील यांनी कायमच समाजातील सर्व घटकांची काळजी घेतली आहे. आपण गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात २४ दिवस कम्युनिटी किचन चालवून ६० हजार नागरिकांना अन्नदान केले.
उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले, युवा नेते प्रतीक पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही सफाई कामगार, आशासेविका पोलीस बांधवांचा सन्मान करीत आहोत. सफाई कामगार कोरोनाच्या संकट काळातही स्वच्छतेचे व्रत पार पाडत आहेत. त्यांचा आम्हास सार्थ अभिमान आहे. स्वच्छता भक्ती से भी बडी होती है, या शब्दांत त्यांचा पत्रात सन्मान केला आहे. यावेळी ज्येष्ठ कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष एम.जे.पाटील, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, अभिजीत रासकर, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष रफिक पठाण, असंघटित कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर चव्हाण, नगरपालिकेचे आरोग्याधिकारी साहेबराव जाधव, बंडा वाघमोडे, मोहन भिंगार्डे जयंत, दारिद्र्य निर्मूलन अभियानाचे संघटक राजाराम जाधव उपस्थित होते.