इस्लामपूर : जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरने समाजात चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन शिक्षण चळवळीचा सन्मान केला आहे, असे गौरवोद्गार माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी काढले.
जायंट्स ग्रुपतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि विद्यार्थी कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक एकनाथराव जाधव, राजकुमार ओसवाल, जायंट्सचे अध्यक्ष दुष्यंत राजमाने उपस्थित होते. जायंट्स ग्रुपच्यावतीने एस. बी. मोहिरे, बी. एस.आत्तार, भक्ती ढवळीकर, डॉ. नजीम शेख, अभिजित मोरे या पाच आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जायंट्स सेवा सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध, हस्ताक्षर व चित्रकला स्पधेर्तील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रा. अनिल पाटील यांनी स्वागत केले. प्रा. राजा माळगी यांनी प्रास्ताविक केले. नितीन पारेख यांनी आभार मानले. कार्यवाह रणजित जाधव व खजिनदार अॅड. श्रीकांत पाटील यांनी संयोजन केले. यावेळी गजानन परब, ईश्वरभाई पटेल, छगन कोठारी, अभय शहा, संपत कोकाटे, प्रवीण फल्ले, नितीन फल्ले, राकेश कोठारी, डॉ. गोपालकृष्ण परदेशी उपस्थित होते.
फोटो : ०४०१२०२१-आयएसएलएम-जायंटस ग्रुप न्यूज
ओळ : इस्लामपूर येथे जायंट्स ग्रुपच्या कार्यक्रमात विश्वास सायनाकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एकनाथराव जाधव, दुष्यंत राजमाने, राजकुमार ओसवाल उपस्थित होते.